नावात बरेच काही असते, बरं का!

    दिनांक :13-Oct-2019
नियाज खान नावाच्या एका अधिकार्‍याने म्हटले की, त्यांना स्वत:चे नाव बदलवायचे आहे. कारण खान नावामुळे त्यांना ‘मॉब लिचिंग’ची भीती आहे. एखादा उन्मादी जमाव त्यांना कधीही घेरून मारू शकतो. रिलिजनचा पवित्र वेष असलेले दाढी-टोपीवाले कुणीही सुरक्षित नाहीत. नियाज यांनी तर चित्रपटातील खान तारकांनाही नाव बदलविण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या नावामुळेच आजकाल त्यांचे चित्रपट चालत नाहीत, असा नियाज यांचा दावा आहे. वर्तमानपत्रांच्या बातम्यांमध्ये नियाज यांचा परिचय, मध्यप्रदेश सरकारचे एक अधिकारी म्हणून छापला आहे. ते परिवहन विभागात उपसचिव आहेत. म्हणजे चांगले शिकले-सवरले आहेत. मदरसाछाप कठमुल्ले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावरून, आमच्या इथे बोलण्याचे स्वातंत्र्य ओव्हरफ्लो होत आहे, हेच जाहीर होते. कुणाही जमावाने त्यांना घेरले नाही, म्हणजेच सहिष्णुताही शिल्लक आहे.
 

 
आता येऊ नाव बदलण्याच्या गोष्टीवर िंकवा स्पष्टच सांगायचे तर बदललेल्या नावांवर. नावात काय आहे, असे भलेही सांगितले जात असले, तरी खरे म्हणजे नावात बरेच काही आहे. जर त्यांना आपल्या नावात बदल करायची इच्छा असेल तर त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, तो ‘बदल’ नसून ‘दुरुस्ती’ असेल. नाव तर भूतकाळातील कुणा घायाळ शतकात त्यांच्या कुणा अगतिक पूर्वजांनी कुठल्यातरी परिस्थितीत बदलले असेल! परंतु, आता ते जर असे करत असतील, तर ती एका ‘चुकीची दुरुस्ती’च असेल आणि ते जर ही आवश्यक दुरुस्ती करत असतील, तर कुठल्या तरी अनाम आणि आतापर्यंत माती बनलेल्या कबरेतील निद्रिस्त एखाद्या अगतिक पूर्वजाच्या आत्म्यालाही शांती मिळेल. असे करणे म्हणजे कब्रस्तानात न जाताही, असली फातिहा पढण्याचे काम कदाचित पहिल्यांदाच होईल.
 
मी इतिहासाचा गहन जिज्ञासू आहे. गेल्या 25 वर्षांपासून, भारताच्या गेल्या एक हजार वर्षांच्या भीषण इतिहासाच्या अंधार्‍या भुयारातून सतत भटकत आहे. दिल्लीतील 700 वर्षांच्या सुलतान-बादशाहांच्या कारकीर्दीत लिहिल्या गेलेल्या दस्तावेजांमध्ये, तलवारीच्या जोरावर सातत्याने झालेल्या कन्व्हर्शनचे तपशील भरून पडले आहेत. अलीगड मुस्लिम विद्यापीठाने, झोप उडवून टाकतील अशा या अरबी व फारसी भाषेतील दस्तावेजांचा िंहदीत अनुवाद केला आहे. ज्यांना आपल्या नावांबद्दल कुठलीही शंका िंकवा कुठलीही भीती असेल तर ते आरशाप्रमाणे आपला चेहरा, कत्तल, विध्वंस आणि रक्तपाताने भरलेल्या या भीषण तपशिलात बघू शकतात. त्याला यात आपल्या कमनशिबी आणि अपमानित पूर्वजांचे दर्शन अवश्य होईल, याची खात्री बाळगा. प्रत्येक शतकात, शत्रूची संपत्ती म्हणून जनानखान्यात पाठविलेल्या हजारोंच्या संख्येतील असहाय माता दिसतील. युद्धातील विजयानंतर उन्मादी सुलतानी-बाहशाही फौजांच्या अत्याचारांमुळे देशातील कानाकोपर्‍यात अगणित नावे बदलली गेली आहेत. पिढ्यान्‌पिढ्या शिक्षेच्या नावावर एक नवी ओळख त्यांच्या कपाळावर चिकटवली जात राहिली.
 
अरब, तुर्क आणि नंतर गझनीहून येऊन त्यांनी िंसध, मुलतान, लाहोर, दिल्ली, बंगाल, गुजरात, काश्मीर, विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगरसहित अगणित लहान-मोठ्या संस्थानांवर कब्जा केला. त्यांचे निर्दयी सैन्य खरेतर एक उन्मादी जमावच होते. त्यांच्यापाशी स्वत:चे झेंडे होते, नारे होते, प्रतीक होते आणि सर्वात वर एक मजहबी उन्माद होता. ते स्वत:ला सुलतान, बादशाह, नवाब आणि निजाम म्हणवून घेत. सतत सुरू असलेल्या बेहिशेबी लुटीवर ते पोसले जात होते. त्यांनी आपल्या दहशतीच्या राज्याची िंकमत याच देशातून वसूल केली.
 
त्यांच्या मजहबी न्यायदानात हारणार्‍यांसमोर शिक्षेचे दोनच लक्षणीय पर्याय होते- मरा, नाहीतर नाव बदला. जीव वाचविण्यासाठी ज्यांनी दुसरी शिक्षा स्वीकारली ते बदललेल्या नावांसोबत सरदार बनले. या अर्थाने जे स्वत:ला एखाद्या विशिष्ट विचारधारेचे शांतिप्रिय अनुयायी मानण्याच्या भ्रमात आतापर्यंत आहेत, ते खरेतर ‘अनुयायी’ नसून ‘पीडित’ आहेत. फॉलोअर नाहीत, तर शिक्षा भोगणारे व्हिक्टिम! आठवणींवर जमलेली धूळ पुसण्याची आवश्यकता आहे. खरी ओळख आरशाप्रमाणे स्वच्छ आणि समोर आहेच. मग एक ‘दुरुस्ती’ तर जरुरी आहेच.
 
सर्वकाही सरळ आणि एकदम स्वच्छ होते. इस्लाम स्वीकारायचा नसेल, तर जिम्मी म्हणजे दुसर्‍या दर्जाच्या नागरिकांप्रमाणे नेहमी अपमानित केले जाल. जिझिया चुकवावा लागेल. घोड्याची स्वारी करता येणार नाही. गंध, जानव्यावर बंदी. मैला वाहून न्यावा लागेल. अकाली मरावे लागेल आणि मरणही अजीबात सोपे नसेल. ज्यांना मजहबच्या नावावर थोपविला जाणारा हा अपमान मान्य नव्हता, त्यांना िंभतीत चिणण्यात आले, त्यांची कातडी सोलून त्यात भुसा भरण्यात आला, त्यांना बैल िंकवा गाढवाच्या कातडीत कोंबून शिवून फेकण्यात आले, हत्तीच्या पायांखाली तुडविण्यात आले, टोकदार सळाखींच्या िंपजर्‍यात वरून फेकण्यात आले, गळे कापण्यात आले, नखे उपडण्यात आली, डोळ्यांत गरम सळई घुसविली. तुघलकाच्या काळात तर या ‘बहादुरी’च्या कृत्यांसाठी एक वेगळे खातेच तयार करण्यात आले होते. त्याच्या किल्ल्याबाहेर भुसा भरलेल्या ताज्या मानवी कातड्या िंकवा जनावरांच्या ताज्या कातडीत कोंबून शिवलेले मृतप्राय लोक दररोज टांगलेले असत. हृदय पिळवटून टाकणार्‍या या दृश्यांचा प्रभाव असा व्हायचा की, नाव बदलून घेण्याची गती वेगाने वाढायची. जीव कुणाला प्रिय नसणार? जीव वाचवून नाव बदलणे सोपे होते आणि मग बदललेल्या नावासोबत, मंदिरांच्या मलब्यावर उभारलेल्या इबादतगाहांमध्ये (मशिदीत) दिवसातून पाच वेळा जाण्याची सक्ती. पिढ्यान्‌पिढ्या भोगलेल्या या अमर्याद अत्याचाराची आणि अपमानाची कल्पना तर करून बघा! काय पण ‘क्वॉलिटी ऑफ लाईफ’ होती! आणि काही दिवसांपूर्वी एक ‘तुकडे गँग’मधील तरुणी आपल्या एका प्रसिद्ध मुलाखतीत म्हणत होती की, आम्ही अशा एका देशात राहात आहोत की...! तिथे उपस्थित विद्वान नेत्याने विचारले की, मग तुम्हाला यमन, सीरिया िंकवा पाकिस्तानात राहण्याची इच्छा आहे का?
 
दहशतीच्या या अंतहीन कृत्यांपासून वाचण्याची इच्छा असेल, तर ‘जौहर’चा एक पर्याय सर्व ठिकाणी खुला होता. त्यात हजारोंच्या संख्येत महिलांना आत्महत्येला कवटाळावे लागले. सर्वसामान्यांची दशा सोडून द्या, गेल्या 300 वर्षांच्या चौकटीतच गुरू तेगबहादूर िंसग आणि संभाजी राजे भोसले यांच्या आयुष्यातील शेवटची पानेच वाचून घ्या. हृदय थरकापून टाकण्यास ही दोन महान पात्रेच पुरेशी आहेत.
 
त्या काळात भारतात जे नृशंस अत्याचार करण्यात आले, त्यांच्या कहाण्या सुलतान तसेच बादशाहांनी आपल्या शौर्यकथा म्हणून लिहून घेतल्या. जेणेकरून, गुलाम बनविलेल्या देशात एखादी सत्ता ताकद आणि भयाच्या जोरावर कशी राबविता येऊ शकते, हे इतिहासाच्या लक्षात यावे! ज्या जिद्दी लोकांनी ऐकले नाही, त्यांनी मैला वाहून नेण्यासारखे घृणित कामदेखील मान्य केले आणि त्यांना पिढ्यान्‌पिढ्या याच कामात अडकवून ठेवण्यात आले. नंतर ते एक अस्पृश्य जातीच्या रूपाने समोर आलेत. िंहदीचे अमर लेखक अमृतलाल नागर यांचा, ‘नाच्यौ बहुत गोपाल’ या कादंबरीच्या रूपात लिहिलेला एक कमालीचा प्रबंध आहे. त्यात लेखक वाचकांना, मेहतरादींच्या क्षत्रिय गोत्राच्या तळाशी असलेल्या पराभूत राज्यांच्या हतभागी राजकुळांपर्यंत घेऊन जातात, तेही सकारण आणि पुराव्यानिशी.
 
1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीने गुजरातवर केलेल्या हल्ल्याच्या विजयानंतर राय कर्ण यांच्या अनेक राण्यांसह सर्वात देखणी राणी कमलादी व तिची सहा महिन्यांची मुलगी देवलदी यांना दिल्लीत आणण्यात आले. कमलादी हिला खिलजीने स्वत:च्या जनानखान्यात ठेवले आणि देवलदी जेव्हा वयात आली तेव्हा स्वत:चा मुलगा- खुसरो खानशी तिचा निकाह करून दिला. खिलजीच्या काळात एक मौलाना शम्सुद्दीन तुर्क, हदीसच्या 400 पुस्तकांसह मुलतानला आला. तिथे त्याने खिलजीच्या गौरवार्थ एक पुस्तक लिहून दिल्लीला पाठविले. तो लिहितो- ‘‘मी बाहशाहांचे दोन-तीन गुण असे ऐकले आहेत की, जे प्रत्येक कट्‌टर मजहबीबादशाहात असले पाहिजे. त्यातील एक हा आहे की, िंहदूंना अपमानित, पतित आणि दरिद्री बनविण्यात आले आहे. िंहदूंच्या स्त्रिया आणि मुले मुसलमानांच्या दरवाजावर भीक मागत असतात. हे इस्लामच्या बादशाहा! तुझी ही धर्मनिष्ठा कौतुकास्पदच आहे.’’
 
तुघलकांच्या काळात मोरोक्को देशातून भारतात आलेल्या इब्नबतूता याने कंपिला नामक एका िंहदू राज्याचा उल्लेख केला आहे. हा मोहम्मद बिन तुघलकचा बाप गयासुद्दीन तुघलकच्या काळातील घटनाक्रम आहे. सुलतानच्या फौजांनी कंपिलाच्या राजाच्या युद्धात पराभव केला. राजाच्या राजपरिवारातील महिलांसह नगरातील अनेक अमीर, मंत्री आणि सामान्य लोकांनीही एका विशाल अग्निकुंडात जळून स्वत:चे प्राण दिलेत. फौज नगरात दाखल होताच लोकांना पकडण्याचे सत्र सुरू झाले. राजाची 11 मुलेही पकडली गेलीत. सर्वांनाच शिक्षेचे तेच दोन पर्याय देण्यात आले. ‘मरा नाहीतर मान्य करा!’ त्यांनी आपली नावे बदलली. इब्नबतूता स्वत: यातील तिघांना भेटला होता. त्यांची बदललेली नावे नासिर, बख्तियार व मुहरवार होती, असे इब्नबतूता सांगतो. त्यांचे आडनाव अबू मुस्लिम ठेवण्यात आले. या तिघांशी इब्नबतूताची मैत्री झाली होती.
 
या घटना तर दिल्लीवरील कब्जाच्या केवळ 100 वर्षांनंतरच्या आहेत. अशी दृश्ये औरंगजेबपर्यंत तसेच दूरदूरपर्यंत काबीज निजाम-नवाबांच्या अगणित संस्थानांपर्यंत हजारोंच्या संख्येत प्रत्येक शतकात प्रत्येक ठिकाणी पसरली आहेत. शिवाजी महाराजांमुळे आग्र्‍यात तोंडघशी पडलेल्या औरंगजेबने नंतर शिवाजीच्या एका शूर सेनापती- नेताजी पालकरला दक्षिणेत फसवून कैद केले आणि त्या काळातील ‘झेड प्लस’ सुरक्षाव्यवस्थेत त्याला दिल्लीत आणण्यात आले. शिवाजीचा अपमान करण्यासाठी या बदनाम बादशाहाने नेताजीसमोर तेच दोन पर्याय ठेवले- इस्लाम कबूल कर नाहीतर मर. नेताजीने ‘मजहबाच्या नावावर तरी या मजहबी शिक्षेतून’ सुटका होऊन पळता येईल, या आशेने अनिच्छेनेच कलमा पढल्या. त्याचे बदललेले नाव इतिहासात नोंदले गेले- मोहम्मद कुली खान!
 
27 मार्च 1667 चा दिवस होता तो. बहुसंख्यक काफिरांसाठी अमर्याद असहिष्णुतेच्या त्या शतकात, महाराष्ट्रातून नेताजी पालकरच्या संपूर्ण कुटुंबाला उचलून दिल्लीला नेण्यात आले. त्याची पत्नी व मुलांनाही हीच इस्लाम कबूल करण्याची शिक्षा देण्यात आली. आता नेताजी पालकरच स्वत: मोहम्मद कुली खान झाला होता म्हणून त्याच्या पत्नीचा त्याच्याशी इस्लामी पद्धतीने पुन्हा एकदा निकाहचा तमाशा रचण्यात आला. एवढे सर्व केल्यानंतर औरंगजेबने नेताजी पालकरला काबुल-खैबरच्या लढाईत पाठविले. कमबख्त काफीर! मर आपल्या कर्माने, जग आपल्या नशिबाने!
 
नेताजी पालकर शिवाजी महाराजांचा जुना विश्वासू सहकारी होता. बदललेल्या नावाचा कलंक तो औरंगजेबच्या सरदारीत नऊ वर्षेपर्यंत सहन करीत राहिला आणि एकदा संधी साधून, सापळ्यात अडकलेल्या िंसहाने छलांग मारावी तसा तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्रात परत आला आणि आपल्या आयुष्यात नाव बदलल्याची चूक दुरुस्त करीत मोहम्मद कुली खानवरून तो पुन्हा नेताजी पालकर झाला. त्याने नाव बदलण्याचे आवश्यक काम, आपल्या येणार्‍या एखाद्या पिढीतील भावी खानाच्या भरोसे सोडले नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी संधी मिळताच बदललेली नावे त्याच पिढीत दुरुस्तही केलीत.
 
अल्लामा इकबालचे पूर्वज सप्रू गोत्राचे काश्मिरी ब्राह्मण होते आणि इकबाल यांना याचा अभिमान होता. परंतु, हा मात्र बदललेल्या नावात अडकलेला एक अभिमानी होता, जो दुरुस्तीच्या पायरीपर्यंत येऊ शकला नाही. भारतात अनेक नवे धर्म (रिलिजन) आलेत, परंतु या रिलिजनच्या प्रसारप्रक्रियेत, कुणाला मारून-मुटकून बौद्ध, जैन िंकवा शीख बनविले गेले असे कुणीही कधी ऐकले नाही. परंतु, मार-मारून मुसलमान बनविणे, ही म्हण सार्‍या िंहदुस्थानातील प्रत्येक गावात इतकी रूढ झाली की, कुठल्याही प्रकारची बळजोरी झाली, तर एखादी अशिक्षित व्यक्तीदेखील म्हणून द्यायची की, कशाला मारून-मारून मुसलमान बनवून राहिला, सोडून दे!
 
इतिहासाच्या या दर्‍या-खोर्‍यांत भटकताना कधी कधी विचार येतो की, ज्या स्त्रिया आणि मुली युद्धानंतर लुटीचा माल म्हणून उचलल्या गेल्यात आणि सैनिकांमध्ये शत्रूंची संपत्ती म्हणून वाटल्या गेल्यात, त्यांचे वंशज आज कोणत्या चेहर्‍यात कुठे व कसे असतील? असा विचार येताच आजचे जिन्ना, जिलानी, जरदारी, गिलानी, आझाद, अब्दुल्ला, आझम, भट्‌ट, भुट्‌टो, इरफान, इकबाल, इमाम, खान, सलमान, सुलेमान, हबीब, हाफिझ सर्वच्या सर्व डोळ्यांसमोर तरळू लागतात.
 
त्या बदललेल्या नावांची मुले, नंतर त्यांची मुले आणि नंतर पुन्हा त्यांची मुले कुठे तर राहिली, वसली असतील! आज त्यांची ओळख कुठल्या रूपात करायला हवी? कमलादी व देवलदीची कहाणी त्यांच्यासोबत थोडीच संपली आहे. नासिर, बख्तियार, मुहरवाल अपत्यहीन होऊन कब्रस्तानात थोडेच गेले असतील? हा तर हजारो पानांच्या त्या नृशंस भूतकाळातील फारच थोडा तपशील आहे आणि 1947 नंतर निर्माण झालेल्या पाकिस्तानच्या िंसधमधील ती जनसंख्या कुठे पचली, जी आता दोन टक्क्यांहूनही कमी उरली आहे?
 
आज जर कुणी आपले नाव बदलत असेल, तर या सामान्य चूक-दुरुस्तीने माहीत नाही कुठे आणि कुठला आत्मा किती काळानंतर शांतीचा अनुभव घेईल! माहीत नाही कुठल्या परिस्थितीत कुठल्या पूर्वजाने, स्त्रीने िंकवा मनुष्याने आपले नाव बदलले असेल आणि त्याच परिस्थितीत त्याला कुठल्या कबरीत दफन केले असेल! कोण म्हणते की नावात काही ठेवले नाही! महाराज, जरा आरशात आपला चेहरा बघा! स्मरणावर साचलेली काही शतकांतील धूळ साफ करण्याची जरा धडपड करा! लक्षात ठेवा, नावात बरेच काही ठेवले आहे.
••
विजय मनोहर तिवारी
9893043200