पुढच्या वर्षी या महिन्यात येणार मिर्झापूर -२

    दिनांक :14-Oct-2019
मुंबई,
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील बहुचर्चित वेब सीरिज मिर्झापूरचा सीक्वल लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे पहिलं सीजन पाहिलेल्या अनेकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मिर्झापूरमधील दोन भावांची बबलू आणि गुड्डूची जोडी लोकांना खुप आवडली होती. मिर्झापूर-2 मधून गुड्डू पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. यावेळी लोकांना माझं वेगळं रुप मिर्झापूर-2 मध्ये पाहायला मिळेल, असं गुड्डूची भूमिका साकारणाऱ्या अली फजलने सांगितलं.

 
 
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचा पहिला सीजन 16 नोव्हेंबर 2018 ला रिलीज झाला होता. पहिला सीजन संपल्यानंतर कथा अर्धवट राहिली होती, त्यामुळे दुसऱ्या सीजनमध्ये काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. मी मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आता एडिटिंगचं काम सुरु आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात मिर्झापूर-2 रिलीज होईल, असा अंदाज अली फजलने व्यक्त केला. नव्या सीजनमध्ये अनेक नवीन गोष्टी नवीन आहेत. माझी वेगळी भूमिका यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल, असं अली फजलने म्हटलं.
अली फजल व्यतिरिक्त रसिका दुग्गलनेही पहिल्या सीजनमध्ये दमदार काम केलं होतं. पुन्हा एकदा रसिका दुसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहे. रसिकाने मिर्झापूर सीजन-2 चं शूटिगं लखनौमधून सुरु केलं होतं. सध्या ती बनारसमध्ये शूटिंग करत आहे. या सीरिजचा काही भाग मुंबईतही शूट होणार आहे. एक्सेल एन्टरटेनमेंट या वेबसीरिजची निर्मिती करत आहे.