'सेवासंकल्प' लोकार्पण सोहळा संपन्न

    दिनांक :14-Oct-2019
चिखली,
मनोरुग्णच्या रक्ताची नाती त्याच्याकडून होणारा त्रास सहन होत नाही म्हणून रस्त्यावर सोडून देऊन मोकळे होतात पण त्याची रस्त्यावर होणारी ससेलोट अवहेलना दुर्दशा पाहून आरती व नंदू पालवे या जोडप्याने त्यांची दुःख वाटून घेण्याचे ठरविले. रस्त्यावर बेवारस फिरणारा रुग्ण प्रकल्पावर आणून त्याची दररोज आंघोळ जेवण, उपचार करतात. हसत खेळत सेवा संकल्प वरील कष्ट हलके केले जातात. याच सेवासंकल्पचा सातव्या वर्धापन दिनी लोकार्पण सोहळा आज सोमवारी पार पडला. 

 
 
सेवा संकल्प वरील मनोरुग्णाची होत असलेली सेवा पाहून चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी पुढाकार घेऊन मनोरुग्णांसाठी स्नानगृह व प्रसाधनगृह बांधून दिले .चिखली अर्बन बँकेचा जीवनगौरव पुरस्कार मनोरुग्णाची सेवा करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल पालवे दाम्पत्य यांना नुकताच बँकेच्या आमसभेच्या वेळेस देण्यात आला. रामायणाचार्य य संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनात पळसखेड येथे भव्य निवास व्यवस्था, भोजन कक्ष, गोशाळा, याची निर्मिती करण्यात आली व त्याचेसुद्धा लोकार्पण करण्यात आले. चिखली अर्बन बँक परिवाराने देखील येथे सेवा संकल्प च्या सातव्या वर्धापन दिनी स्वर्गीय भगवानदासजी गुप्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता गृह बांधून दिले आहेत त्याचे सुद्धा लोकार्पण सोमवारी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी मंदाताई आमटे, स्वामी हरीचैतन्यानंद सरस्वती महाराज,  रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
 
 
 
सतीश गुप्त यांची सेवा संकल्प परिवाराशी अशी घट्ट मैत्री जुळली की त्यांनी यावेळेस चा वाढदिवस सेवा संकल्प येथे साधेपणाने साजरा केला. आपल्या वाढदिवसाला हार-तुरे न आणता त्यांनी येणाऱ्या प्रत्येक हितचिंतकांना व कर्मचाऱ्याला सेवा संकल्प साठी मदत निधी द्यावा असे आवाहन केले. या विनंतीला प्रचंड प्रतिसाद सर्व स्नेहीजनांची देऊन सेवासंकल्प कलशा मध्ये १ लाख ३३ हजार ७५३ रुपये मदत जमा झाली ती मदत चिखली अर्बन बँक चे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी सोमवारी सेवा संकल्पाच्या सातव्या वर्धापन दिनी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर महाराज, स्वामी हरीचैतन्यानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थित प्रकल्पाचे संचालक आरती व नंदकिशोर पालवे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आली.
 
 
चिखली अर्बन बँक परिवारातील संचालक,कर्मचारी आपल्या सामाजिक कार्यासाठी सर्वपरिचित आहे कश्मीर पूरपरिस्थिती असो महाराष्ट्रातील पूर परिस्थिती असो शहीद कुटुंबांना मदत साठी चिखली अर्बन बँक परिवार नेहमी अग्रेसर राहिली आहे .पालवे दाम्पत्य मनोरुणाच्या सेवेसाठी पळसखेड सपकाळ येथे सेवासंकल्प हा प्रकल्प चालवत आहे, आपण सर्वांनी देखील आपआपल्या परीने सेवा संकल्प परिवारास मदत करावी असे आव्हान चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष माननीय सतीश गुप्त यांनी केले आहे.