जनअभियानातून राष्ट्रनिर्माण हेच महायुतीचे धोरण - मुख्यमंत्री

    दिनांक :14-Oct-2019
अभय इंगळे
दिग्रस,
भेदभाव आणि समाजात फुट पाडणारे काँग्रेसी राजकारण आता इतिहास जमा झाले आहे. जो काम करतो, जनता त्यालाच साथ देते. याच विश्वासाने भाजपा शिवसेना युती काम करीत आहे, जनकल्याण ते राष्ट्रकल्याण, जनअभियानापासून राष्ट्रनिर्माण हेच महायुतीचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस म्हणाले.  

 
 
आज दिग्रस येथे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, दिग्रस विधानसभा मतदार संघात विकास कामासाठी व बंजारा समाजाच्या पोहरादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी संजय राठोड यांनी सतत पाठपुरावा केला,त्यांची कामा प्रती आस्था पाहून या परिसरासाठी रुपये कमी केले नाही करोडो रुपयांचा विकास संजय राठोड यांच्या माध्यमातून झाला आहे आणि पुढेही होणार आहे. संजय राठोड यांच्या पाठीमागे उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणविस यांचा आशिर्वाद आहेच, येथील जनतेने सुध्दा मतदान रुपी आशिर्वाद देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.
या सभेला शेतकरी संगटणेचे किशोर तिवारी, भाजपाचे अजय दुबे, महादेव सुपारे, शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे,दिग्रस नपच्या नगराध्यक्षा सदफजहाॅ मो जावेद, माजी नगराध्यक्ष विजय बंग, रिपाईचे सोना मानकर यांच्या सह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.