मोठ्या भावाने केला लहान भावाचा झोपेतच खून

    दिनांक :15-Oct-2019
अर्जुनी, 
तालुक्यातील सिरोली (टोली) येथे मोठ्या भावाने लहान भावाची झोपेतच हत्या केल्याची घटना मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता घडली. ललीत संतप राऊत असे मृतकाचे नाव आहे.
 
 
 
सिरोली/टोली येथे संपत राऊत हे आपल्या दोन अविवाहित मुलासोबत राहत होते. लहान मुलगा ललीतची प्रकृती बरी नसल्याने तो घरी झोपलेला होता. यावेळी मोठा मुलगा मंगेश याने रागाचे भरात धारदार शस्राने झोपेतच ललीतच्या मानेवर व डोक्यावर वार करुन खून केला व घरासमोर जाऊन बसला. ललीतच्या हत्या करण्यामागील कारण मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून आरोपी मंंगेशाला ताब्यात घेतले व मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरला पाठविला आहे. अर्जुनी मोर.चे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आाहे.