आलियासोबत सिनेमा करायला रणवीरचा नकार

    दिनांक :15-Oct-2019
मुंबई,
'ऑस्कर'साठी निवड झालेला 'गली बॉय' चित्रपट एकत्र केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांनं अभिनेत्री आलिया भट्टसोबत पुन्हा काम करायला नकार दिला आहे. त्यामुळं बॉलिवूडमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. रणवीरनं नकार दिल्यामुळं आलिया देखील प्रचंड नाराज असल्याचं समजतं.

 
आलियाच्या या नाराजीचं कारण आहे ते म्हणजे संजय लीला भन्साली यांचा 'गंगूबाई' हा चित्रपट. आलिया आणि सलमान खान यांचा 'इंशाअल्लाह' चित्रपट थंडबस्त्यात गेल्यानंतर भन्साळी यांनी आलियाला घेऊन 'गंगूबाई' चित्रपट करण्याचा विचार केला आहे. याच चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्याची निवड होणं बाकी होतं. मुंबई मिररच्या वृत्तानुसार या मुख्य भूमिकेसाठी रणवीरलाच भन्साली यांची पहिली पसंती होती. यासंदर्भात रणवीरसोबत बोलणंही झालं परंतू रणवीरनं चित्रपट करण्यास साफ नकार दिला. रणवीरनं नकार देण्याचं कारणही स्पष्ट न केल्यानं आलिया त्याच्यावर नाराज आहे.
'गंगुबाई' मध्ये कामाठीपुरातील महिलेची कथा दाखवण्यात येणार असून चित्रपटाची कथा लेखक हुसैन जैदी लिखीत 'माफिया क्वींस ऑफ मुंबई' पुस्तकातील एका भागावर आधारित असणार आहे.
आलिया माझी वहिनी झाली तर मी सगळ्यात आनंदी: करिना कपूर
आलिया सध्या तिच्या वडिलांच्या 'सडक २' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्याचप्रमाणे ती करण जोहरच्या 'तख्त' तर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ती बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. रणवीर आणि आलिया यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गली बॉय' या चित्रपटाची ऑस्कर फिल्म अवॉर्ड्ससाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली असून या बॉलिवूड चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कॅटेगरितील पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. तसंच आलिया आणि रणवीर या दोघांनी या पूर्वी जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं आहे.
रणबीर कपूरनंही दिला नकार
'गंगूबाई' कोठेवालीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणवीरसोबत रणबीरलाही विचारण्यात आलं होतं परंतु, रणबीरनं देखील या प्रोजेक्टसाठी नकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.