आरमोरीत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

    दिनांक :16-Oct-2019
आरमोरी,
पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी आरमोरी नगरमध्ये मतदार व मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आरमोरी पोलीस स्टेशन येथून ही रॅली सुरू होऊन ती इंदिरा गांधी चौक मज्जितद चौक गायकवाड, चौक आरमोरी बर्डी भगतसिंग चौक, जुना बस स्टॉप आणि शेवटी समारोप पोलीस स्टेशन येथील पटांगणावर करण्यात आला.  
 
 
रॅलीदरम्यान नागरिकांना मतदान करणे आपल्याला का गरजेचे आहे याबाबत माहिती देण्यात आली. रॅलीमध्ये पोलिस स्टेशनचे  अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीला पोलीस निरीक्षक डी. पी. सूर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवली. रॅलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोडसे, पोलीस नाईक वसंत जोजालकर, भजनराव दरवंडे, पोलीस शिपाई प्रवीण धांदरे , पोलीस कर्मचारी आनंद गलबले, रवींद्र कुंभारे, जितेंद्र कोलेकर, रेखा मंडपे, भजनराव दरोडे यांसह जवळपास 100 होमगार्ड सहभागी झाले होते. मतदान जनजागृती रॅली विषयी माहिती संपूर्ण आरमोरी येथील नागरिकांना देण्यात आली.