करोडपती होताच स्पर्धकाची बिघडली तब्येत

    दिनांक :17-Oct-2019
सध्याचा लोकप्रिय आणि तितकाच चर्चेतील शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी)’ पर्व ११. या शोच्या माध्यमातून बॉलिवूडचे बिग बी, अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या शोकडे मनोरंजनासोबत माहिता स्त्रोत म्हणून देखील पाहिले जाते. नुकताच या शोला त्यांचा तिसरा करोडपती मिळाला आहे. या स्पर्धकाचे नाव गौतम कुमार झा असे असून ते बिहारमधील मधुबनी येथे राहतात. गौतम यांनी ५० लाख रुपयांचा पल्ला पार पाडताना चारही लाइफलाइन वापरल्या होत्या. मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी एक कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे.
 
 
गौतम कुमार झा हे केबीसीचे चाहते नसल्याचा खुलासा त्यांनी शो दरम्यान केला. तसेच त्यांचा केबीसेमध्ये येण्याचा विचारही नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पत्नीच्या आग्रहा खातर त्यांनी केबीसीमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पत्नीला गौतम यांच्याकडे अफाट सामान्य ज्ञान असल्याचा विश्वास होता. त्यामुळे ते केबीसी जिंकतील असे त्यांना आधीपासूनच वाटत होते.
गौतम यांनी पत्नीच्या इच्छेखातर केबीसीमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. गौतम हे पहिले यूपीएसी परिक्षेची तयार करत होते. आता देखील त्यांचा परिक्षेचा अभ्यास सुरु आहे. सध्या गौतम सरकारी नोकरी करतात. आयआयटी खडगपूरमधून इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया येथे नोकरी मिळाली. सध्या ते तेथे पत्नीसोबत राहतात.
दरम्यान केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी गौतम फारसे उत्साही नसल्याचे दिसत होते. करोडपती झाल्यानंतरही गौतम इतर स्पर्धकांप्रमाणे उत्साही दिसले नाहीत. शोच्या सुरुवातीपासून शांत बसलेले गौतम यांची एक कोटी जिंकल्यानंतर अचनाक तब्बेत बिघडली. त्यांना समोर ठेवलेले पाणी उचलून पिण्यासही त्रास होऊ लागला. अमिताभ यांनी लगेच त्यांच्या पत्नीला मंचावर बोलावले. काही वेळानंतर गौतम यांची तब्बेत ठीक झाली.