'स्वदेशी' देशाला संपंन्नतेकडे नेणारी एकमेव चळवळ

    दिनांक :17-Oct-2019
बुलडाणा, 
भारताची एकता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे, देशाची आत्मनिर्भरता, सांस्कृतिक मूल्यांचा विकास, प्राकृतिक संपदेचे संवर्धन आणि सर्व क्षेत्र आणि सकल समाज यांची संतुलीत प्रगती याबाबतीत जनतेमधे जागृती निर्माण करणारे संघटन स्वदेशी जागरण मंच चिखली शाखेच्या वतीने स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संयोजक काश्मिरीलाल यांचे व्याख्यान बुधवारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय चिखली येथे संपन्न झाले.
 
 
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संयोजक राजीव क्षीरसागर आणि विदर्भ प्रांत संयोजक  शिरिष तारे, अकोला विभागसंयोजक प्रशांत जोशी, बुलडाना जिल्हा संयोजक शिवहरी सागळे यांच्यासह रा.स्व.संघ चिखलीचे नगरसंघचालक शरद भाला, विभाग कार्यवाह शामसुंदर पारीक, डॉ दारोकर ,पवनकुमार लढ्ढा यांची उपस्थिती होती.
 
आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानातुन महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्वदेशीचा कानमंत्र देतांना त्यांनी अनेक ऊत्साहवर्धक घटना सांगीतल्या. नोकरीपुरते शिक्षण न घेता समाज संवर्धनातुन देश संपन्नतेकडे जावा, तो आत्मनिर्भर व्हावा म्हणुन स्वदेशीचा स्वत:पासुन अंगीकार करत आपले कुटुंब, शेजारी, ईष्टमित्र व संपुर्ण समाज स्वदेशीविचाराने भारुन टाकावा. ऊद्योजक बनुन समाजात रोजगार निर्माण करुन देश संपन्न बनवन्यात आपले हित जोपासावे असे क्रांतीकारी विचार व्यक्त केले. त्यांचे अभ्यासपुर्ण ओघवत्या वाणीने श्रोते वर्गात चैतन्य निर्माण होऊन प्रचंड टाळ्याच्या कडकडाटातुन तो व्यक्त होत होता.
 
 
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन महावीद्यालयाचे प्रशासकीय अधीकारी पवनकुमार लढ्ढा यांनी तर आभार प्राचार्य डाँ. दारोकर यांनी मानले. व्याखानानंतर स्वदेशी जागरणमंचाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली .त्यात बुलडाना, चिखली, मेहकर येथील कार्यकर्ते उपस्थीत होते.