ट्रक-कार धडकेत ५ जखमी

    दिनांक :17-Oct-2019

 
गोबरवाही,
ट्रकने इनोव्हाला दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना पवनारखारी ते डोंगरी (बु.) मार्गावर मंगळवारी घडली. ट्रक क्रमांक सीजी 04/एनए 6608 चा चालक रंजित पटले याने इनोव्हा कार क्रमांक एमएच 40/एआर 4156 ला जबर धडक दिली. या धडकेत प्रमोद  बिसेन , दिलीप  बोरकर, दिलीप बांगरे, हूपेंद्र चौधरी, विवेक देशमुख  सर्व रा. तुमसर जखमी झाले. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.