बेटी बचाओ-बेटी पढाओ जाणीव जागृती

    दिनांक :17-Oct-2019
 
 
 
यवतमाळ, 
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सावरगड ग्रामपचांयतमध्ये ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत जाणीव-जागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. शनिवारी जिल्हा परिषद शाळा सावरगड येथुन गावात प्रभात फेरी काढली. गावातील हनुमान मंदीरजवळ ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ यावर पटनाट्य घेऊन जनजागृती केली. कचरा व्यवस्थापन, शोषखड्डे वापर,प्लॅस्टिक वापरावर बंदी यावर मार्गर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियानाचे मान्यवर उपस्थित होते.