कामाचा हिशोब जनतेसमोर मांडा; आम्ही सरस ठरू - मुख्यमंत्री

    दिनांक :19-Oct-2019
सावली(प्रतिनिधी),
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातुन महायुतीचे उमेदवार संदीप गड्डमवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा, मी ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्राचा पालकत्व स्विकारतो यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. आपला जनादेश हा महायुती सोबत राहून शिवशाही चे सरकार पुन्हा राज्या मधे येउद्या असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

 
आज सावली येथे जाहिर सभा घेण्यात आलीत्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी आमदार अतुल देशकर यांसह अनेक नेते उपस्तित होते. आज झालेल्या जाहिर सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजना सांगत विरोधी पक्ष कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसवर चौफेर टीका केली. विरोधकांचे त्यांचे 15 वर्ष व आमचे 5 वर्ष यांचा हिशेब जनते समोर मांडा आम्ही केव्हाही सरस ठरू एवढी कामे आम्ही केली आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा महायुतीला जनादेश द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.