कुरखेड्यात विविध पक्षांचे बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन

    दिनांक :19-Oct-2019
 
कुरखेडा,
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा येथे आज प्रचाराच्या अंतीम दिवशी भाजपा, काँग्रेस, वंचीत बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवारांकडून विविध रॅलींच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 
 
 
कुरखेडा या तालुका मुख्यालयी शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराची संधी साधून विविध राजकीय व अपक्ष उमेदवाराच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहर गजबजून गेले होते.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना व रीपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार भाजपाचे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रचारार्थ कुरखेडा तालुका भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शनिवारी सकाळी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली.
 
 
कुरखेडा शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यात आला या रॅलीमध्ये भाजपा युवामोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष चांगदेव फाये,प्रभारी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.