हळदीचे महत्त्व

    दिनांक :19-Oct-2019
हळद ही गुणकारीच आहे. आयुर्वेदांत तर औषधी म्हणून तिला महत्त्व आहेच; पण आपल्या धर्मातही मंगलाचे प्रतिक म्हणून तिला म्हणूणनच स्थान देण्यात आले आहे. आपल्या आहारशास्त्रातही हळदीचे स्थान अढळ आहे. ती अँटीसेप्टीक आहे. धर्मशास्त्रानुसार हळद का महत्त्वाची त्याचे काही मुद्दे- 

 
  • पूजा करताना हाताला व मानेजवळ हळदीचा छोटा तिलक केल्याने गुरू प्रबळ होऊन वाणी मध्ये शूध्दता येते.
  • हळदिचे दान शुभ मानलं गेलयं. याने प्रकृतीच्या त्रासांवर उपाय होऊन गुरू ग्रहात अनुकूलता येते ज्यांना गुरू वाईट आहे व ऑक्टोबर नंतर खराब आहे त्यांनी हा उपाय करावा.
  • पूजेनंतर कपाळावर हळदीचे तिलक केल्याने कार्यात सफलता मिळते.
  • दरवाज्याच्या कोपर्‍यावर हळदीची रेघ काढल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.
  • आंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान केल्याने शारीरिक मानसिक शुद्धता येते. करिअरच्या सफलतेसाठी हा प्रयोग अचूक आहे.
  • हळदीच्या गाठीला तलम कपड्यात गुंडाळून डोक्याजवळ ठेवल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत. बाहेरील वाईट हवेच्या झोतापासून संरक्षण होते.
  • दर गुरुवारी श्री गणेशाला एक चिमूटभर हळद लावल्याने लग्न संबंधातील येणार्‍या अडचणी दूर होतात.
  • भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या प्रतिमेच्या मागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने घरात लग्नाचे योग लवकर येतात.
  • हवनात हिचा वापर करतात सूर्याला हळद मिश्रित पाण्याने अर्घ्य दिल्याने मूलीचे लग्न तिच्या मनपसंत मुला सोबत होते.
  • हळदीच्या माळेने कुठचेही मंत्र जाप केल्याने त्या व्यक्तीला विलक्षण ताकद मिळते.