राज्याच्या विकासासाठी आम्ही दिवस रात्र एक करणार- संजय कुटे

    दिनांक :19-Oct-2019
शेगांव,
निवडणुक ही लोकशाहीचा आत्मा आहे, ती निकोप पध्दतीने आणी वैचारीक विरोधच झाला पाहीजे पातळी सोडुन प्रचार होता कामा नये. भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अत्यंत कटाक्षाने प्रचारात हे पथ्य पाळले असे भाजपाचे उमेदवार संजय कुटे यांनी म्हटले आहे. 

 
 
आज प्रचाराचा शेवटचा दिवस शेगाव मधे भव्य रँली काढुन कुटेंनी शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीचा समारोप करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानताना कार्यकर्त्यांनी सोशल मिडिया फेसबुक व प्रत्यक्ष प्रचार करतांना स्वत:चा संयम ढळु दिला नाही आणि सुसंस्क्रुतपणाचा दाखला दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच आणखी एकदिवस असाच संयम ठेऊन मतदारांशी संपर्क करुन 21 तारखेला प्रत्यक्ष मतदान करुन घ्या, विजय आपलाच असल्याचे ते म्हणाले.
 
"जे काम होऊ शकते तेच आश्वासन दिले व प्रामाणीक प्रयत्न करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला" असेही ते म्हणाले. गेल्या ५ वर्षात शेकडो कामे फडणवीस सरकारने केली आहेत. काँग्रेसने 15वर्षात जे केले नाही त्यापेक्षा कीतीतरी जास्त पटित भाजपा महायुतीने कामे केली आहेत असे त्यांनी ठणकावून सांगितले. मी जाती पातीच्या नावावर मत मागत नाही तर विकास कामावर मत मागत आहे विकासाच्या बाबतीत आमच्यासोबत कोही स्पर्धा करु शकत नाही दिवस-रात्र मुख्यमंत्र्यांनी व त्या़चे सहकाऱ्यांनी फक्त विकासाचाच ध्यास घेतला पुढिल काळातील योजना तयार असून सर्वच क्षेत्रात भरीव कामाचा वेग आणखी गतीमान करु त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडुन द्या असेही आवाहन त्यांनी केले.