अवैध्य वृक्षतोडीचा गांधी पुतळ्यापुढे उपोषणाद्वारे निषेध

    दिनांक :02-Oct-2019
 
 
 
हिंगणघाट,
विवेकानंद कॉलनीतील अवैध वृक्षतोडिचा आज शहरातील जयस्तम्भ चौकातिल गांधी पुतळ्यापुढे लाक्षणिक उपोषनाद्वारे निषेध नोंदविन्यात आला. न्यू यशवंत येथील विवेकानंद सोसायटीच्या पार्क मधील सुमारे २५ वर्षे जूनी सहा रेन ट्री तसेच एक निलगिरीचे झाडांची १५ दिवसांपूर्वी मुळापासुन कत्तल करण्यात आली. यासंदर्भात पर्यावरण संवर्धन संस्था तसेच शहरातील अन्य पर्यावरणप्रेमीनीं आज लाक्षणिक उपोषनाद्वारे प्रशासनाचा निषेध नोंदविला.
याप्रकरणी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी, मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी उपस्थितांना आठ दिवसात कारवाईचे आश्वासन दिले. लाक्षणिक उपोषनात सर्वश्री आशिष भोयर, नितीन सिंगरु, अनिल भोंगाड़े, प्रवीण कडु,प्रा अभिजीत डाखोरे, गजु कुबड़े,ज्ञानेश्वर चौधरी,पत्रकार केशव तितरे इत्यादी सहभागी होते.