जादू टोण्याच्या संशयातून वृद्ध महिलेची हत्या, आरोपी फरार

    दिनांक :02-Oct-2019
 
 
 
कुरखेडा,
जुन्या भांडणाचा राग अनावर झाल्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटणा काल मंगळवारी  ६ वाजेचा सुमारास नजीकच्या मोहगांव ( वाकडी) येथे घडली
सुमीत्रा तानूजी उईके असे वृद्ध मृतक महीलेचे नाव असून आरोपी गावातीलच नरेश श्रीराम उईके (३५ )आहे. जादू टोण्याचा संशयावरून मृतकाच्या कूटूंबियाशी आरोपीचे जूने भांडण होते सदर भांडणाचा राग मनात धरत आरोपी नरेश याने सांयकाळी सहा वाजताच्या सुमारास ,महिलेला घराशेजारीच गाठत कुऱ्हाडीने तिच्या मानेवर व छातीत वार केला कुऱ्हाडीच्या वाराने महिलेचा जागीच मृत्यू झाला यावेळी मृतक महिले सोबत असलेल्या अन्य एका महीलेला सूद्धा आरोपीने कुऱ्हाडीने मारण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसगांवधान राखल्याने ती महिला थोडक्यात बचावली घटनेनंतर आरोपीने घटणास्थळावरून पळ काढला. मदत मीळण्यापूर्वीच वृद्धेचा तिथेच मृत्यु झाला. घटनेची माहीती मीळताच कुरखेडा पोलीसानी शव ताब्यात घेत पंचनामा केला व आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास व आरोपीचा शोध ठाणेदार सूधाकर देडे यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक समीर केदार पो उपनिरीक्षक पंकज चव्हाण, प्रशांत रेळेकर ,हवालदार अमृत मेहर ,जांभुळकर करीत आहेत.