वाशीम: देशी कट्टा विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :02-Oct-2019
वाशीम,
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत रिसोड नाक्यावरुन लाखाळा चौकाकडे जात असलेल्या एका इसमाकडून काडतूसासह देशी कट्टा जप्त केला.
30 ऑक्टोबर रोजी पो.उप.नि. अमोल जाधव व त्यांचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, एक ईसम त्यांचे अंगात लांब बाह्याचे टि - शर्ट व निळा जिन्स पॅन्ट घालुन रिसोड नाक्यावरुन लाखाळा चौकाकडे जाणार आहे. त्याचेकडे एक देशी कट्टा त्याचे कमरेला खोसलेला आहे. अशा माहितीवरुन दोन पंच व स्टाफसह खाजगी वाहनाने रवाना होवुन जुना रिसोड नाका ते लाखाळा रोडवर पारस प्लाझा समोर नाकाबंदी केली असता अंदाजे 8 वाजताचे दरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणे एक इसम येतांना दिसला. त्यास थांबवून त्याचे नाव व गांव विचारले असता विनोद रविंद्र इंगळे (वय 24) रा. पंचशिल नगर वाशीम असे सांगीतले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेच्या मागील बाजूस काळ्या रंगाचा देशी कट्टा मॅगझीनसह किंमत 2 हजार 550 रुपयेचा मुद्देमाल सापडला. त्यावरुन उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
 
 
 
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोनि शिवा ठाकरे, पोनि बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अमोल जाधव, विजय शिंगारे, प्रशांत अंभोरे, रामकृष्ण नागरे, ज्ञानदेव मात्रे, गणेश बर्गे, गजानन कर्‍हाळे यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.