बोलेरो व ऑटोची समोरासमोर धडक एक ठार तीन जखमी

    दिनांक :20-Oct-2019
चिखली, 
चिखली शहरातील मौनीबाबा संस्थानजवळ रविवार ला दुपारी 4 वाजेच्या सुमारास बोलेरो क्रं MH28 C5608 व ऑटो क्रं MH28 H 2108 ची समोरासमोर धडक होऊन एक ठार व तीन जखमी झाले.
 
 
या बाबत सविस्तर असे की चिखली येथून संभाजी नगर येथे जाणारा ऑटो व चिखली शहराकडे येणारी बोलेरो यांच्यात मौनीबाबा संस्थान जवळील चौकात समोरासमोर धडक होऊन तुषार संतोष घेवंदे वय 15 वर्ष हा मुलगा जागीच ठार झाला. संतोष घेवंदे वय 40, आशा घेवंदे 35 व ऑटो चालक गजानन भंडारे वय 50 हे जखमी झाले. त्यांना त्वरीत ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. जखमी ऑटो चालक व आशा घेवंदे यांना पुढील उपचारा करीता बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे. टक्कर झाल्यानंतर ऑटो पलटी झाला. घटनास्थळी जमलेल्या जमावाने ऑटो सरळ करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी बोलेरो चालकला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चौहान हे करीत आहे.