कियारा अडवाणीने केली गुंडांना मारहाण

    दिनांक :20-Oct-2019
लखनौ,
शाहिद कपूरसोबत 'कबीर सिंह' या चित्रपटात आपल्या शानदार केमिस्ट्री आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी कियारा अडवाणी या दिवसात इतर चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. सध्या तिच्याकडे पाच चित्रपट आहेत. नुकतीच कियारा 'इंदू की जवानी' या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लखनऊमध्ये आली होती. तिते ती गुंडांना मारहाण करताना दिसली.

कियारा लखनऊच्या गोमती नगर येथील मॉलमध्ये चित्रपटाचे चित्रिकरण करत होती. चित्रपटाच्या एका दृश्यात तिला मॉलमध्ये खरेदी करताना आणि नंतर गुंडांच्या छेडछाडीचा बळी पडताना दाखवले गेले आहे. तसेच तिला या सर्वाची भीती वाटण्याऐवजी ती त्या गुंडांची चांगलीत पिटाई करते असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर त्या दृश्याचे चित्रिकरण संपते.
 
 
या चित्रिकरणादरम्यान कियाराला पाहण्यासाठी तिचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चित्रिकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी 'इंदू की जवानी' चित्रपटात एका डेटिंग अॅपचा वापर करणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात तिला अनेक विचित्र परिस्थितींना सामोरे जावे लागते.