जान्हवीच्या नव्या कारचं ‘श्रीदेवी’ कनेक्शन

    दिनांक :21-Oct-2019
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं नातं किती खास होतं हे साऱ्यांनाच माहित आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीने स्वत:ला सावरत धाकटी बहिण खुशीलादेखील सांभाळलं. मात्र आजही जान्हवी श्रीदेवी यांना प्रचंड मिस करताना दिसते. काही दिवसापूर्वीच जान्हवीने नवीन कार विकत घेतली. विशेष म्हणजे या कारच्या माध्यमातून तिने श्रीदेवी यांची आठवण जतन करुन ठेवली आहे.
 
 
 
जान्हवीने अलिकडेच एक नवीन मर्सिडीज कार खरेदी केली असून तिने या गाडीच्या नंबर प्लेटच्या माध्यमातून श्रीदेवी यांची आठवण जतन करुन ठेवली आहे. श्रीदेवी यांच्याकडे एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज गाडी होती. या गाडीचा क्रमांक MH 02 DZ 7666 असा होता. श्रीदेवी कायम कुठे बाहेर जाताना याच गाडीतून जायच्या. विशेष म्हणजे जान्हवीने तिच्या नव्या गाडीसाठी सुद्धा हाच क्रमांक निवडला आहे. त्यामुळे जान्हवीने या नंबर प्लेटच्या माध्यमातून आपल्या आईची आठवण जतन करुन ठेवली आहे.
दरम्यान, जान्हवीने हळूहळू कलाविश्वामध्ये स्वत:च स्थान भक्कम केलं आहे. २०१८ मध्ये तिने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या जान्हवी गुंजन ‘सक्सेना : द कारगिल गर्ल’ आणि ‘रुह आफ्जा’, ‘दोस्ताना २’, ‘बॉम्बे गर्ल’ आणि ‘तख्त’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.