मोहगाव मतदार क्रेंद्रावर एक तास मशिन बंद

    दिनांक :21-Oct-2019
- मतदाराच्या लागल्या होत्या रांगा
- एक तासा नंतर मतदान सुरळीत
गिरड, 
हिंगणघाट विधानसभा क्षेत्र क्रमांक ४७ मधिल समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथिल बुथ क्रमांक ५० मधिल इव्हिएम मशिन एक तास बंद राहिल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 

 
 
सध्या तालुक्यात सर्वत्र सोयाबीन कापणीच्या कामाला वेग आला असून आभाळात दाटून येत असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू असलेल्या सकाळीच शेतकरी शेतमजूर मतदान केंद्रावर आले होते मात्र तब्बल एक तास मशिन बंद असल्याने मोहगाव येथील मतदान केंद्रावर शेतकरी शेतमजूराची चांगलीच फजीती झाली.सकाळी ७ वाजता वेळेवरच या मतदार कैद्रावर मतदान सुरू झाले. मात्र अवघ्या काही वेळातच मशिन मध्ये ११ मतदान पडल्या नंतर मशिन मध्ये बिघाड झाल्याने मतदार कैंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारान मध्ये एकच तारांबळ उडाली शेवटी तांत्रिक अडचणी दूर करणाऱ्या टिमने ८.५० मिनिटांनी मशिन दुरुस्ती करून मतदान सुरळीत केले.या वेळी मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.