आऊटिंग ट्रिप!

    दिनांक :22-Oct-2019
विदेशातली ट्रिप हवी असेल आणि बजेटमध्येही परवडणारी असेल, तर परदेशातील कोस्टारिको, जिम्बाब्वे, श्रीलंका, इंडोनेशिया हे भारतीयांनी अनुभवण्यासारखे आहेत. पर्यटनामुळे आपली भटकंती तर होतेच शिवाय त्या त्या देशांतील जीवनशैली, लाईफस्टाईल, संस्कृती, संशोधन, उद्योग-व्यवसाय यांचीही ओळख होतेच, शिवाय ट्रॅव्हलिंग टाईमपण वाचतो. 

 
 
पर्यटन तसा मजेत मस्त जगणार्‍यांचा हौशी कप्पा. देशात आणि परदेशातल्या अनेक शहरांची माहिती करून घेत फिरणार्‍या भटक्यांची आपल्याकडे तशी कमी नाही, हल्ली मिनी पर्यटन, वन डे पिकनिक, लॉंग स्टे टूरिझम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पर्यटन हा तसा खर्चीक विषय असल्याने अनेक जण इच्छा असूनही लो बजेटमुळे परदेशी जाणे टाळतात. अनेकदा भारताच्या आसपास फिरणे अगदी दोघा-चौघांनी जाणेही खिशाला परवडणारे असते, पण याची नेमकी माहिती नसेल तर ऐन सीझनमध्ये मग कुठे जायचे, किती खर्च येईल, हॉटेल्स बरे मिळेल का, आपली सोय होईल का, अशी शोधाशोधा सुरू होते.
 
शेकडो पर्यटन कंपन्या आणि तितक्याच पटीने उपलब्ध असणारी प्रवासाची आधुनिक साधने, यामुळे गत दहा वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. वर्षभराची थकान घलवणे आणि पुन्हा नव्या चॅलेंजकरिता नवा उत्साह मिळवण्याकरिता रिफ्रेशमेंट म्हणूनही आऊिंटगची गरज भासतेच. त्यातही लक्षात राहणारी ट्रिप हवी असेल आणि बजेटमध्येही परवडणारी असेल, तर परदेशातील कोस्टारिको, झिम्बाब्वे, श्रीलंका, इंडोनेशिया हे भारताच्या लगतचे देश अनुभवण्यासारखे आहेत. पर्यटनामुळे आपली भटकंती तर होतेच, शिवाय त्या त्या देशांतील जीवनशैली, लाईफस्टाईल, संस्कृती, संशोधन, उद्योग-व्यवसाय यांचीही ओळख होतेच. 

 
 
कोस्टारिका
लोन्ली प्लॅनेट असा ज्या प्रदेशाचा उल्लेख केला जातो, ते भारतीयांना पसंतीस उतरलेले पर्यटन ठिकाण म्हणजे कोस्टारिका होय. कोस्टारिका मुख्यत्वे तिथल्या उधाणलेल्या समुद्रकिनार्‍यांकरिता प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सर्फिंग, जेट स्कीईंग, राफ्टिंग आदी अॅडव्हेंचर्सचा अनुभव घेता येतो. इथे असणारे प्री कोलंबियन गोल्ड म्युझियम आदी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. तुम्ही मोजक्या दिवसांत कोस्टारिकाची सफर करू शकता. त्यासाठी व्हिसाचा खूप त्रास नसतो. एका अर्जात तो आपल्याला मिळतो. कोस्टारिकासाठी 5 दिवस पुरेसे आहेत, शिवाय कुटुंबातील प्रत्येकासाठी येथे काहीना काही आहे. थीम पार्कपासून मॉल आणि नैसर्गिक पर्यटन हे कोस्टारिकाचे मुख्य आकर्षण.
 

 
 
झिम्बाब्वे
ज्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे आणि प्राण्यांवर प्रेम आहे, अशा निसर्गप्रेमींकरिता झिम्बाब्वे हा देश पर्यटनाकरिता उत्तम मानलो जातो. या ठिकाणी वाईल्ड लाईफ जर्नी अनुभवता येते, शिवाय वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंदही अनुभवता येतो. उन्हाळ्याच्या दिवसांत इथल्या नॅशनल पार्कमध्ये सैर करण्याची मजा एकदातरी अनुभवली पाहिजे. तसे फिरारेमध्ये आपण झिम्बाब्बेबद्दल सविस्तर माहिती घेतलेलीच आहे. पण, 2018 ला सुरू झालेल्या वर्ल्ड मॅजिक पार्कबाबत मी आवर्जून सांगीन. जेथे तुम्ही भरपूर मनोरंजन अनुभवाल.
 

 
 
श्रीलंका
फक्त भारतीयच नाही तर जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेल्या श्रीलंका या देशातील अनेक टूरिस्टस्पॉट देखणे आणि बजेटमध्येही आहेत. मात्र, या देशाला भेट देण्याकरिता मे आणि जून महिना निवडणे अधिक योग्य ठरेल. या ठिकाणी तुम्हाला इतिहासातील अनेक रहस्यं उलघडता येतील. भारतीय रुपया मजबूत असल्याने भारतीयांना परवडण्यासारखे आहे.
 

 
 
इंडोनेशिया
इंडोनेशियातील बाली पॅलेस पर्यटकांच्या आवडीचा स्पॉट आहे. या ठिकाणी मे महिन्यात सफर करणे तुलनेने स्वस्त ठरते. इथले समुद्रकिनारे प्रशस्त आणि स्वच्छतेसोबतच सुरक्षितही आहेत. चला तर मग, यंदाचा उन्हाळा बजेट ट्रिपने लक्षात राहण्याजोगा करू या...