भीषण अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

    दिनांक :22-Oct-2019
सडक अर्जुनी,
ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी व गोगाव येथील तीन विद्यार्थ्यांचा सडक अर्जुनी येथील खजुरी या गावालगत मुख्य महामार्गावर ट्रक-दुचाकींचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. 

 
गांगलवाडी येथील अंकुश खारकर व किशोर पगडे आणि सत्यम बनकर गोगाव अशी अपघातात मृत विद्यार्थ्यांची नावे असून ते गांगलवाडी व गोगाव येथून गोंदिया येथे सत्यम बनकर याच्या टू व्हीलर ने रोजगार नोकरीच्या संदर्भात पेपर देण्याकरिता जात असताना गोंदिया जिल्ह्यातील खजुरी गावाजवळ टाटा एस MH ३५ AJ १२३९ या वाहनाच्या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 
 
 
 
तिघेही विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते. या दुर्दैवी घटनेने कुटुंबियांवर दुःख कोसळले आहेत तर अंकुश व किशोर आपल्या आईवडिलांना एकुलते असल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास दुगीपार पोलीस करीत आहे.