एका ध्येयवेडयाचे चामोर्शीत आगमन

    दिनांक :22-Oct-2019
चामोर्शी,
भारतातील विविध संस्कृती, ग्रामीण भागातील राहणीमान, शेतकऱ्यांची स्थिती, आदिवासीची संस्कृती व जीवनमानाची शैली, धार्मिक स्थळे, ईत्यादिचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने जयपूरच्या अंकित अरोरा या ध्येयवेड्या युवकाने सायकलने भारत भ्रमण करण्याचा संकल्प करून नुकताच देशातील अंदाजे 15 राज्यात सायकलने भ्रमण करून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरात सोमवारी (21आक्टोबर) रोजी आगमन झाले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. 
 
 
अंकित अरोरा या युवकाने चामोर्शी शहरात मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी स्वागत केले. यावेळी मंगेश सदूलवार, मंगेश आनंदवार, संदीप बोदलकर, प्रफुल चलाख, आदी उपस्थित होते. त्यानंतर गजानन भांडेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित करून त्यांच्या विषयी माहिती दिली.
  
राजस्थानमधील अजमेर येथील 29 वर्षीय अंकित अरोरा हे अंदाजे 26 महिन्यांपासून सायकलने भारतभ्रमण करीत आहे. त्यांनी आपली यात्रा 27 ऑगस्ट 2017 पासुन सुरु करत आतापर्यंत दिल्ली, हिमाचल, लडाख, पंजाब, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, अंदबार निकोबार, आंद्रप्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यातील गावागावात व शहरामध्ये भ्रमंती करून मार्च 2019 मध्ये महाराष्ट्रात दाखल झाले या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती जाणून घेतल्यानंतर 18 आक्टोबरला या युवकाने गडचिरोली येथे आल्यावर गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.शिवनाथ कुंबारे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कुंभारे यांच्याकडून विविध सामाजिक, धार्मिक संस्कृतीची माहिती जाणून घेतली.
  
गडचिरोलीत दोन दिवस वास्तव्यानंतर ते सोमवारी रात्री चामोर्शीत दाखल झाल्यानंतर गजानन भांडेकर यांचेकडे वास्तव्यात असताना चामोर्शी तालुक्यातील धार्मिक स्थळ, शिक्षण, शेती व्यवसाय, मस्यपालन, आदिवासींची संस्कृती, मार्कंडा देवस्थानविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर ते आज आष्टी येथे संजय पंदिलवर यांची भेट घेऊन आल्लापल्ली व हेमलकसा येथे डॉ.प्रकाश आमटे याची भेट घेण्यासाठी प्रस्थान करणार आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.