दिवाळी सणावरून घ्यावयाची शिकवण

    दिनांक :24-Oct-2019
मुकेश जुनघरे 
 
दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवसाला विविध सकारात्मक गोष्टी घडून आलेल्या आहेत, यात एक अतिशय महत्त्वाचे म्हणजे सुखाची दुःखावर मात करणे हे होय. आपण दिवाळी का बरे साजरी करतो, याचे महत्त्व प्रत्येक िंहदू व्यक्तीला माहिती असणारचं, या दिवशी श्रीरामचंद्र आपल्या 14 वर्षांच्या वनवासावरून परतले होते, त्या 14 वर्षांच्या कठीण कालावधीत त्यांनी किती दुःख सोसले, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकतं नाही. श्रीरामचंद्रांच्या आयुष्याबद्‌दल वा जीवनाबद्‌दल जरी अभ्यास केला तर, आपल्याला समजून येते की, त्यांचे बालपण जरी आनंदात गेले तरी त्यांचे तरुणपण हे फार कठीण गेले. त्या तरुणपणात लग्नानंतर त्यांना 14 वर्षांचा वनवास सहन करावा लागला, ती परिस्थिती कुठलीही असो त्यांनी ती स्वीकारली. त्यांची साथ सीता आणि श्रीरामचंद्रांचे कनिष्ठ भाऊ लक्ष्मण यांनी कधीच सोडली नाही, त्यांनीसुद्धा वनवास स्वीकारला. या 14 वर्षांच्या वनवासात ते तिघेही एकमेकांची काळजी घेत जगत होते. 

 
 
 
आजच्या काळात जर बघितले तर काही वेगळेच घडून येते, खरे म्हणजे आजच्या काळात मनाला घाव घालणार्‍या गोष्टी भरपूर घडतात. लक्षात ठेवा हा सण फक्त साजरा करायचा नसून त्याचे महत्त्व आचरणात आणले पाहिजे. साधारणत: सांगायचे झाले तर श्रीरामचंद्र यांच्या इतिहासाबद्‌दल सर्वांना माहिती आहे, पण कुठलीही व्यक्ती त्याची शिकवण घेऊ शकला नाही.
 
 
प्रत्येक माणसाने आजपासून हा संकल्प घ्यायला हवा की, परिस्थिती कुठलीही असो मी त्याला सामोरे जाणार, कठीण परिश्रमासाठी कायम तयार असेल. माझ्याकडन गरजू लोकांना जी मदत होऊ शकते ती मी करेल.