ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग दि. २४ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :24-Oct-2019
|
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नुसार दिनांक २४ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक ०२ शके १९४१
 
☀ सूर्योदय -०६:१२
☀ सूर्यास्त -१७:४२
⭐ प्रात: संध्या - स.०५:१८ ते स.०६:३३
⭐ सायं संध्या - १८:०३ ते १९:१७
⭐ अपराण्हकाळ - १३:३३ ते १५:४९
⭐ प्रदोषकाळ - १८:०३ ते २०:३३
⭐ निशीथ काळ - २३:४९ ते २४:३९
⭐ राहु काळ - १३:४६ ते १५:१३
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१३ ते दु.०३:४५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
 
**या दिवशी भात खावू नये. 
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:१९ ते ०१:४५
अमृत मुहूर्त-- ०१:४५ ते ०३:११
👉विजय मुहूर्त— १४:१९ ते १५:००
पृथ्वीवर अग्निवास १८:३९ पर्यंत.
राहु मुखात १०:३५ पर्यंत नंतर केतु मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १८:३९ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - कृष्ण
तिथी - एकादशी (१८:३९ पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - मघा (१०:३५ नंतर पू.फा.)
योग - शुक्ल (११:५६ नंतर ब्रम्हा)
करण - बव (०७:४८ नंतर बालव १८:३९ नंतर कौलव)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - तुळ
गुरु रास - वृश्चिक
विशेष - रमा एकादशी(उपवास), वसुबारस गोवत्सद्वादशी, प्रदोषकाळी गोवत्सपूजन (प्रदोष काळ १८:०३ ते २०:२०)
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.
👉 "बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना व विष्णुंना केशरी पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तूप व हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
🛑विशेष टीप- प्राचीन सूर्यसिद्धांत पंचांगानुसार व धर्मशास्त्रानुसार वसुबारस २४ ऑक्टोबर रोजीच असून २५ ऑक्टोबर या दिवशी नाही याची कृपया नोंद घ्यावी
👉 चंद्रबळ:-मिथुन,सिंह,तुळ,वृश्चिक,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.