असदुद्दीन ओवैसींची भीती...

    दिनांक :25-Oct-2019
|
नमम
श्रीनिवास वैद्य  
 
महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतिवर्षानिमित्त त्यांच्या विविध िंचतनपैलूंवर लेख प्रकाशित होत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुसलिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे सर्वेसर्वा व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही एक लेख लिहून, मला गांधींची आज का गरज भासते, यावर आपले विचार मांडले आहेत. 
 
 
2014 सालापासून केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आणि 2019 साली पुन्हा तेच सत्तारूढ झाल्यापासून, भारतातील मुसलमानांमध्ये एक भीती निर्माण केली जात आहे िंकवा ओवैसी यांच्या मते ही भीती खरेच विद्यमान आहे. ती भीती म्हणजे, भारतीय राजकारणात आता मुसलमानांचे महत्त्व हळूहळू संपत आहे. एकाही मुसलमान व्यक्तीला उमेदवारी न देता राजकीय पक्ष केंद्रात िंकवा राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करत आहेत. याला ते मुसलमानांचे मर्यादितीकरण (मार्जिनलायझेशन) असे म्हणतात. हे असे होणे, भारतीय सेक्युलरवादाला धोका असल्याचे त्यांचे मत आहे. ओवैसी म्हणतात- हिंदूंचा हा जो बहुलतावाद (मेजॉरिटॅरिझम) 2014 पासून सुरू झाला आहे, त्याला महात्मा गांधींचा विरोध होता. पंडित नेहरूंनीदेखील महात्मा गांधींचे हे धोरण पुढे चालू ठेवले. परंतु, आता कॉंग्रेससहित सर्व सेक्युलर राजकीय पक्ष, हिंदू मेजॉरिटॅरिझमच्या मागे स्वार्थासाठी लागले आहेत. भारतीय राजकारण पुन्हा एकदा सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सेक्युलर राजकीय पक्षांनी महात्मा गांधींचा हा विचार पुन्हा अनुसरण्याची गरज आहे, असे ते म्हणतात. अर्थातच, आज ही जी परिस्थिती उद्भवली आहे ती, रा. स्व. संघ आणि भाजपामुळे आहे, असा त्यांचा दावा आहे.
 
 
ही गोष्ट खरी आहे की, भारतातील आजचा हिंदू समाज अधिक जागृत, तसेच आपल्या भवितव्याबाबत अधिक सावध झालेला आहे आणि याचे श्रेय नि:संशयपणे रा. स्व. संघाला दिले पाहिजे. संघाचे तर हे ध्येयच आहे. या देशातील बहुसंख्य असलेला हिंदू समाज आत्मग्लानीत गेल्यामुळेच या देशावर परकीय आक्रमणांसारखी भयानक संकटे आलीत. त्या हिंदू समाजाला जागृत करून, पुन्हा एकदा समरस केले, तर भारतावर भविष्यात असली संकटे येणार नाहीत आणि तो पुन्हा कुणाच्या गुलामगिरीत जाणार नाही, असे संघाचे मत आहे व त्यासाठी गेल्या 94 वर्षांपासून तो कार्यरत आहे. त्याच्या या निरलस कार्यामुळेच आज फळे मिळत आहेत.
 
 
भारतात लोकशाही आहे आणि या लोकशाहीत ‘एक व्यक्ती एक मत’ हे तत्त्व मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच ज्यांची लोकसंख्या अधिक त्यांचेच प्राबल्य सत्तेत असणार. भारत स्वतंत्र झाल्यापासून असे लक्षात येते की, या संदर्भात मुसलमान समाज एकजूट राहिला आणि हिंदू समाज जातिपातीत विभागलेला होता. त्यामुळे अल्पसंख्य असूनही मुसलमान समाजाचे फावत गेले. बहुतेक राजकीय नेत्यांना दूरदृष्टी नसल्यामुळे त्यांनी मुसलमानांच्या एकजूटतेचा सत्तारूढ होण्यासाठी फायदा करून घेतला आणि त्या बदल्यात मुसलमान नेत्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. परंतु, जसजसा हिंदू समाज जातपात विसरून एकजूट होत गेला, तसतशी मुसलमान समाजाच्या एकजूटतेची चमक कमी होत गेली. त्यांचे आकर्षणही कमी होत गेले. मुसलमानांच्या मताशिवाय सत्तारूढ होता येते, हे हिंदू समाजाने दाखवून दिल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांमध्ये हिंदू समाजाचे मन िंजकण्याची चढाओढ सुरू झाली. आता मुसलमान नेत्यांना फारसे कुणी विचारत नसल्याचे दिसून येते. ओवैसी यांची वेदना ही आहे. असेच जर चालू राहिले, तर भारतातील मुसलमानांना, पर्यायाने आमच्यासारख्या नेत्यांना कुणीच विचारणार नाही, त्यांना वालीच राहणार नाही. ही भीती त्यांना आहे व ती भीती ही नेतेमंडळी सर्वसामान्य मुसलमानांच्या मनात भरवीत आहेत.
 
 
भारताची फाळणीदेखील याच भीतिपोटी झाली होती. ब्रिटिशांनी भारतात ‘एक व्यक्ती एक मत’ या तत्त्वावर निवडणुका घेणे सुरू केल्यावर, भारतातील मुसलमान नेत्यांच्या लक्षात आले की, असे झाले तर या भारतात आपल्याला काहीच िंकमत राहणार नाही. कारण हिंदूंची संख्या फार अधिक आहे. त्यामुळे एकूणच सर्व क्षेत्रात त्यांचेच प्राबल्य राहील. या भीतिपोटी मग मुसलमानांसाठी नवा देश हवा, ही मागणी पुढे आली. आता फाळणीनंतर मुसलमानांसाठी एक वेगळा देश तयार झाल्यानंतरही, भारतातील मुसलमानांची मात्र कॉंग्रेससारख्या पक्षामुळे चंगळ होती. मुसलमान नेते जे म्हणतील, ते सर्व कॉंग्रेस सरकार त्यांना देत होते. आता याचा लाभ सर्वसामान्य मुसलमानांना झाला नाही, याला हिंदू समाज कसा जबाबदार असणार? इतकी वर्षे भारतातील मुसलमान नेत्यांनी आपल्या एकजूट गठ्‌ठा मतांच्या भरवशावर हिंदूंना डागण्या दिल्यात, ते घाव हिंदू समाज कसे काय विसरणार? भारताची फाळणीच तर अजून कुणी विसरलेले नाही. त्यावर या डागण्या! हे सर्व आता विसरून जायचे आणि मुसलमानांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हिंदू समाजाने पुढाकार घ्यायचा, असे ओवैसी यांना म्हणायचे आहे का? तसे असेल तर ते आता शक्य दिसत नाही.
 
 
खरेतर, केवळ मुसलमानांना वेगळा देश मिळावा म्हणून या भारताताचे तुकडे पाडल्यानंतर, भारतीय मुसलमानांनी समस्त हिंदूंची माफी मागून, आता आपण गुण्यागोिंवदाने राहू या, अशी शपथ घ्यायला हवी होती. त्यानुसार मुसलमानांच्या आचरणानंतर हिंदूंनीदेखील त्यांना उदार अंत:करणाने माफही केले असते. परंतु, तसे झाले नाही. भारतीय राजकारणाचे स्वरूप बघता, भविष्यातही हा हिंदू समाज जातपात विसरून एक येईल आणि आपल्या एकतेचा परिचय निवडणुकीपासून ते इतरही सर्व बाबींमध्ये देईल, याची या लोकांनी कल्पनाही केलेली नसावी. परंतु, या देशातील बहुसंख्य हिंदू समाजाच्याही काही वेदना आहेत, (ज्या आपल्या बांधवांमुळे निर्माण झाल्या आहेत) त्यांचाही सहानुभूतिपूर्वक विचार करावा, असे मुसलमान नेत्यांच्या मनातही आले नाही. फक्त आणि फक्त आपला व आपल्या समाजाचा स्वार्थच त्यांना डोळ्यांसमोर दिसत होता. हिंदू बिचारा आपल्या जखमा स्वत:च कुरवाळत बसत पुढे जात गेला. हिंदू समाजाच्या वेदनांवर फुंकर घालण्याच्या कितीतरी संधी मुसलमान समाजासमोर आल्या होत्या. परंतु, त्या बेदरकारपणे पायदळी तुडविण्यात आल्या.
 
 
त्यातील, अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद, ही एक नामी संधी होती. हिंदू तर, फक्त अयोध्या, काशी व मथुरा येथील देवस्थाने ताब्यात देण्याची मागणी करत होते. त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. या देशातील मुसलमानांचा प्राधान्याने विचार करण्याचे हिंदूंच्या मनात येण्यासाठी मुसलमानांनी काय केले ते सांगावे. रामजन्मभूमी हिंदूंना सोपवली असती, तर मुसलमानांबद्दल हिंदूंच्या मनात खरेच चांगली भावना निर्माण झाली असती आणि हा समाज आपल्या वेदना विसरूनही गेला असता. तसे झालेले नाही आणि आता हा प्रश्न निर्णायक वळणावर आला आहे. भारतातील राजकारणही एका वेगळ्या वळणाने पुढे जात आहे. अशात, मुसलमान नेत्यांपुढे त्यांच्या स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. हिंदू समाजाप्रमाणेच, मुसलमान समाजातही जागृती येऊन, आपल्या नेत्यांमुळेच आपण ठकविले गेलो आहोत, ही भावना दृढ झाली तर या तमाम नेत्यांचे काही खरे नाही.
 
तिहेरी तलाकविरोधी कायद्यानंतर कदाचित असे विचार मुसलमान समाजात सुरूही झाले असावेत, असे वाटते. त्यामुळेच हे नेते खडबडून जागे झाले असण्याचीच शक्यता आहे. अन्यथा, असदुद्दीन ओवैसीसारख्या जहाल नेत्याला महात्मा गांधींची इतक्या तीव्रतेने आठवण येतीच ना! परंतु, ओवैसीसारख्या नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आता गांधी, नेहरू, सेक्युलर पक्ष यांच्या आड लपून काहीच साध्य होणार नाही. हिंदू समाजाची माफी मागून आणि तसे आचरण केले तरच, भारतीय राजकारणात मुसलमानांचे औचित्य कायम राहील. महात्मा गांधींचे संदर्भ देण्याऐवजी, हिंदू समाजाप्रती कृतज्ञतेची नम्र जाणीव मनात उत्पन्न होऊ देण्यातच ओवैसीसारख्यांचे भले आहे. म्हणून सर्व मुसलमान नेत्यांनी या दृष्टीने प्रामाणिकपणे विचार करून, एका नव्या युगाचा प्रारंभ केला, तर तो महात्मा गांधींना स्वर्गातही शांती मिळवून देईल, यात शंका नाही!
9881717838