'अजय देवगन मला मोठ्या भावासारखा'

    दिनांक :28-Oct-2019
|
मुंबई,
आगामी 'तानाजी: द अनसंग वॉरियर' मध्ये सुपरस्टार अजय देवगनसोबत अभिनेता शरद केळकर दिसणार आहे. शरद म्हणतो अजय देवगन त्याला त्याच्या मोठ्या भावासारखा आहे. शरद अजयसोबत या सिनेमाच्या निमित्ताने चौथ्यांदा काम करत आहे.

 
शरद म्हणतो, 'अजयसोबत मी एक टीव्ही शो, बादशाहो सिनेमा आणि 'गेस्ट इन लंडन' मध्ये काम केलंय. अजय देवगन एक महान अभिनेता आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तो एकदम फोकस्ड अभिनेता आहे. 'तानाजी...'सारखा सिनेमा मी पहिल्यांदाच करतोय. हा सिनेमा पूर्णपणे स्टुडिओत शूट केला आहे. तो थ्रीडी सिनेमा आहे.' या सिनेमात अभिनेत्री काजोलदेखील आहे. हा सिनेमा १७ व्या शतकातला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे.
हा सिनेमा तानाजी मालुसरेच्या जीवनावर आधारित आहे. तानाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती होते. या सिनेमात अजय देवगनसोबत सैफ अली खानदेखील आहे. या सिनेमात सैफ राजपूत अधिकारी उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ आणि अजय देवगन चौथ्यांदा दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी कच्चे धागे, ओमकारा आणि एलओसी या सिनेमात दिसले होते.