दुचाकीतून दोन लाख पळविले

    दिनांक :28-Oct-2019
|
 

 
 
भंडारा,
दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना सेंदूरवाफा येथे घडली. विनोद बिसन ब्राह्मणकर रा. आंधळगाव, ता. सडक अर्जुनी यांनी साकोली येथील स्टेट बँकेतून 2 लाख रुपये काढून डिक्कीत ठेवले. मंगलमूर्ती सभागृहाजवळ दुचाकी उभी करून विनोद बाथरूमला गेले असता अज्ञात चोराने डिक्कीतून दोन लाख रुपये, धनादेश व पासबुक चोरून नेले. याप्रकरणी साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.