स्टारडमची किंमत मोजावी लागते: ऋतिक रोशन

    दिनांक :28-Oct-2019
|
मुंबई,
अभिनेता ऋतिक रोशनचं बॉलिवूड क्षेत्रात हे १९ वं वर्षं सुरू आहे. त्याने प्रेक्षकांना 'कहो ना प्यार है', क्रिश, जिंदगी ना मिलेगी दोबारा सारख्या एकाहून एक सरस सिनेमांची मेजवानी दिली आहे. त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला वॉरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण ऋतिकचं असं म्हणणं आहे की स्टारडमची एक लहानशी किंमत द्यावी लागते.

ऋतिक म्हणतो, 'ही किंमत म्हणजे तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते. सामाजिक जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. तुम्हाला तुम्ही बोललेल्या प्रत्येक शब्दाचं उत्तरदायित्व घ्यावं लागतं. आपल्या खासगी आयुष्याचा थोडा बहुत त्याग करावा लागतो.' मात्र यासाठी त्याला कुठलीही खंत नाही. तो म्हणतो, 'ही लहानशी किंमत आहे, पण स्टारडमच्या वलयाचा उपयोग अनेक चांगल्या गोष्टींकरता केला जाऊ शकतो. अनेक गोष्टींना तुम्ही मुकता, पण अनेक गोष्टी तुम्हाला मिळतात देखील.'
ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा सिनेमा 'वॉर' ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. देशांतर्गत ३०० कोटींचा बिझनेस या सिनेमाने केला आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात या सिनेमाची कमाई ४५० कोटींवर गेली आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांच्यासह आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत आहेत.