ज्वालामुखींचा देश

    दिनांक :29-Oct-2019
|
नीलेश जठार
9823218833
 
जगातील सर्वाधिक ज्वालामुखी असलेला देश म्हणून आईसलॅण्ड ओळखला जातो. या देशाला ज्वालामुखींचे घर असेच म्हटले जाते. येथे 130 पेक्षा अधिक ज्वालामुखी पर्वत आहेत आणि त्यातील बहुतेक ज्वालामुखी जागृत आहेत. आईसलॅण्डने ज्वालामुखींचा उपयोग पर्यटन वाढविण्यासाठी अतिशय कल्पकतेने करून घेतला आहे. येथील ट्रीनुकागिगुरची राजधानी रॅकजाविक शहरापासून 20 किमीवर असलेला ज्वालामुखी सर्वात खोल असून, हे विवर पाहण्यासाठी पर्यटकांना लिफ्टमधून खाली नेले जाते. हे विवर अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उंचीइतके खोल आहे. येथपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना पायीही बरेच अंतर चालावे लागते, मात्र तरीही येथे पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. 

 
 
ज्वालामुखी विवरतज्ज्ञ डॉ. अर्नी स्टेफेंसन यांनी या विवराचा शोध चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1974 साली लावला. 2012 मध्ये ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. अटलांटिक समुद्राला लागून असलेल्या मिड अटलांटिक पर्वतशृंखलेत हा ज्वालामुखी आहे. असे सांगतात की, प्राचीन काळी आईसलॅण्ड हे देव आणि दानवांचे युद्धक्षेत्र होते. येथे देव-दानवांत अनेक युद्धे झाली. त्यातून ज्वालामुखी तयार झाले. ज्वालामुखीचे तोंड म्हणजे नरकाचे द्वार, अशी येथे कल्पना होती. मात्र, आता याच नरकाच्या द्वारातून आत खोलवर जाऊन पर्यटक जिवंत ज्वालामुखीचा थरार अनुभवू शकतात.
 
 
आईसलॅण्ड हे जगाच्या नकाशावर इतक्या उत्तरेकडे आहे की, इथून हिवाळ्यात अरोरा बोरीयालीस म्हणजेच आकाशात दिसणारे हिरवे नॉर्दन लाईटस्‌ बघण्याची संधी खूप जास्त आहे. आईसलॅण्डची राजधानी रेकयाविक येथेदेखील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. येथे अजीबात प्रदूषण नाही आणि त्यामुळेच काळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर आपण असंख्य तारे बघण्याचा आनंद घेऊ शकतो. सभोवती पांढराशुभ्र बर्फ आणि लक असेल तर अदभुत हिरवे नॉर्दन लाईटस्‌ हे आपण अगदी कर्म्फटेबल होऊन पाहू शकतो.
 
 
आईसलॅण्ड येथे अनेक उत्तम हॉटेल्स आहेत, जे उत्तम लोकेशनमध्ये बांधलेले आहेत.