चोरट्यांनी फोडले एटीएम, पण एटीएममध्ये पैसेच नव्हते

    दिनांक :03-Oct-2019
 
 
 
समुद्रपुर,
तालुक्यातील मांडगाव येथिल बॅक ऑफ इंडियाचे एटिएम मशिन चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ निर्माण झाला आहे. २ आक्टोंबरच्या मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मांडगाव येथिल बॅक ऑफ इंडियाच्या एटिएम मशिन रूम मध्ये प्रवेश करीत सुरुवातीला तेथिल सिसीटिव्ही कॅमेरा फोडला व नंतर एटिएम मशिनचा समोरी भाग फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मात्र दोन तिन दिवसांपासून या मशिन मध्ये पैसै नसल्याने चोरट्यांचा डाव फसला.घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढील पोलिस तपास सुरू आहे.