हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार कृष्णा गजबे यांचे नामांकन दाखल

    दिनांक :03-Oct-2019
 
 
 
देसाईगंज,
येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज आरमोरी विधान सभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आ.कृष्णा गजबे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. देसाईगंज येथे आमदार गजबे यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी 10:00 वाजे पासून आरमोरी विधान सभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI च्या पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कृष्णा गजबे यांचे नामांकन अर्ज देसाईगंज येथील निवडणून निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आला.