मंगरुळनाथ पोलिसांनी केले 2 लाख रुपये जप्त

    दिनांक :03-Oct-2019
तर्‍हाळा चेक पोस्टची कारवाई
 
मंगरुळनाथ, 
मंगरुळनाथ पोलिसांनी आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान तर्‍हाळा येथील चेक पोस्टवर 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. निवडणूक काळात मंगरूळनाथ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून ही या आठवड्यातील 3 घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तर्‍हाळा येथील चेक पोस्टवर 3 ऑक्टोबरचे दुपारी बारा वाजताच्या  वाहनांची तपासणी करीत असताना वाहन क्र एमएच 40 एआर 2513 या मारुती स्विफ्ट वाहनाची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये दोन लाख रुपये रोख आढळली. वाहन चालक शंकर पांडुरंग कालापाड रा. सारसी ता. मंगरूळनाथ यांना विचारणा केली असता सदरची रक्कम ही कपडा खरेदी करण्यासाठी अमरावतीला जात असल्याची माहिती ओम जनार्दन सोनोने रा. किन्हीराजा ता. मालेगाव यांनी सांगितली. परंतु सदर व्यापार्‍यांनी जवळ असलेल्या रकमेच्या पावत्या पोलिसांना सादर करता आल्या नाही म्हणून पोलिसांनी जप्ती पंचनामा करून पथक प्रमुखका कडे दिली.
 
 
 
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनोद दिघोरे, एपीआय अतुल तांबे, एपीआय आदिनाथ मोरे ,पीएसआय सुषमा परांडे, अंबादास राठोड, गब्बर पप्पूवाले, गजानन जवादे, हुसेन गारवे, इस्माईल पठाण, रामेश्‍वर मोरे, तथा निवडणूक विभागाचे कर्मचारी यांनी केली आहे.