अचलपूर-परतवाड्यात फक्त रात्रीची संचारबंदी

    दिनांक :03-Oct-2019
अमरावती, 
अचलपूर-परतवाड्यात शांतता प्रस्थापित होत असून, नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन कलम 144 केवळ सायंकाळ ते सकाळ या काळात लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अचलपुरात घडलेल्या एका हिंसाचाराच्या घटनेमुळे कलम 144 नुसार काही काळ जमावबंदी लागू करण्यात आली. तथापि, जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने ती शिथील करण्यात आली आहे. त्यानुसार कलम 144 गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजतापासून शुक्रवारी सकाळी 4.30 पर्यंत अंमलात राहणार आहे. तसा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संदिपकुमार अपार यांनी जारी केला.
 

 
 
नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे. कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. अशी कुठलीही अफवा निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना (07223) 220002 किंवा (0721) 2265041 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांनी केले आहे.
दरम्यान, शहरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी विविध संस्था- संघटनांनीही पुढाकार घेतला असून अचलपूर व्यापार नगरीतील शांतता कायम ठेवण्याचे आवाहन मराठी पत्रकार संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीआय, सराफा असोसिएशन, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना, ह. व्या. प्र. मंडळ हेल्पलाईन, मुव्हमेंट ऑफ पीस अँड जस्टिस, संकल्प सेवा समिती, भूमी बहुउद्देशीय मंडळ, पुनर्जीवन फाऊंडेशन यासह विविध संस्था- संघटनांनी केले आहे.