मी मंत्रीपदासाठी उत्सुक नाहीच : बच्चू कडू

    दिनांक :30-Oct-2019
अचलपुर,
मी आमदार नंतर आधी जनसेवक आहे. शिवसेनाला पांठीबा हा लोकहीतार्थ दिला आहे. यात मंत्रीपदाची अट नाही. त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश घेतला किंवा घेणार या चर्चेला अर्थ नाही, अशी स्पष्ट भुमिका आमदार बच्चू कडू यांनी मांडली. 
 
 
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना पराभुत करत चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश करणार्‍या बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा मतदारसंघात होत असताना कार्यकर्ते भेटी दरम्यान त्यांनी आम्ही शिवसेनेला पाठींबा बिनशर्त दिला असल्याचे सांगितले. अचलपुर व मेळघाटच्या विकास कामाकरीता निधीची कमतरता भासु नये तसेच अचलपुर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पहील्याच अधीवेशनात मांडून पारीत करण्याचे आश्वासन शिवसेना प्रमुख उदधव ठाकरे यांनी दिले आहे. अचलपुर मतदार संघातील जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वावासासाला तडा जाणार नाही, असे बच्चू कडू यांनी कार्यकर्ता भेटी दरम्यान सांगितले.
 
 
 
निवडणुकीतल्या विजयानंतर कुरळपुर्णा येथील पुर्णामाय या त्यांच्या निवासस्थानी दररोज शेकडो कार्यकर्त भेटीला येत आहे. विजयी मिरवणुका काढण्यासाठी त्यांनी नकार दिला आहे. अचलपुर शहर तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेऊन ते आभार व्यक्त करत आहे. अशातच बेगमपुरा प्रभागात कार्यकर्तेच्या घरी भेटीला गेले असता आमदार कडू खुप भावूक झाले होते. एका कार्यकर्त्याने प्रचारा दरम्यानची व्यथा त्यांना सांगितली. दिव्यांग असल्यामुळे पायी फिरू शकत नव्हतो. परतु, अनेक भागात फिरून जनतेत जनजागृती करत होतो. माझे प्रहार विषयीचे प्रेम पाहुन कपबशीच निवडून येईल, असे अनेक मंडळी सांगत होते. त्यामुळे माझाही जोश वाढत होता आपला विजय निच्चीत होईल याची खात्री मला होती, असा तो कार्यकर्ता यावेळी म्हणाला. गेल्या तीन ते चार दिवसापासून बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी घेत आहे.