फिलिपाईन्समध्ये पुन्हा भूकंप, पाच ठार

    दिनांक :31-Oct-2019
मनिला,
फिलिपाईन्सच्या दक्षिणेकडील प्रांताला आज गुरुवारी भूकंपाचा शक्तिशाली धक्का बसला. रिक्टर स्केलवर 6.6 इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपात पाच जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रांताला अलिकडील काळात बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. 
 
 
आजच्या भूकंपातही अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. या धक्क्यानंतर आणखीही काही धक्के जाणवले. यामुळे या संपूर्ण प्रांतातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी व खाजगी कार्यालये तातडीने बंद करण्यात आली. इमारतींच्या ढिगार्‍याखाली अनेक जण दबले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे.