लग्नकार्यात रणवीर धरणार ठेका

    दिनांक :31-Oct-2019
बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन स्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही चांगली जमते. त्यामुळेच अनेक वेळा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करत असतात. इतकंच नाही तर एकमेकांची मस्करीही तितकीच करताना दिसतात. नुकताच याचा प्रत्यय आला असून रणवीरने शेअर केलेल्या एका फोटोवर दीपिकाने एक मजेशीर कमेंट केली आहे. सध्या तिची ही कमेंट आणि रणवीरचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
 
 
 
रणवीरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो प्रचंड हॅण्डसम दिसतो. विशेष म्हणजे त्याचा हा लूक पाहून तो एखाद्या लग्नकार्यासाठी जात असल्याचं वाटत होतं. इतकंच नाही तर नेहमीप्रमाणे त्याने या फोटोला कॅप्शनही हटकेच दिलं होतं. “लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. मनोरंजन करण्यासाठी उपलब्ध असलेली व्यक्ती. लग्न, वाढदिवसाची पार्टी, मुंडन साऱ्यासाठी तयार आहे”, असं कॅप्शन रणवीरने या फोटोला दिलं आहे. त्यावर दीपिकानेही न रहावून अशीच एक हटके कमेंट दिली.
“रणवीर सिंहला तुमच्या पार्टीत बोलवायचं असेल तर दीपिका पदुकोणशी संपर्क साधा”, अशी कमेंट दीपिकाने या फोटोला दिली. विशेष म्हणजे तिची ही कमेंट वाचल्यानंतर अनेकांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला. दीपिकाप्रमाणे अभिनेता अनुपम खेर,एकता कपूर, अर्जुन कपूर, मिमी चक्रवर्ती, करिश्मा कपूर, जतीन शर्मा यांनीही कमेंट केली.