एकतेसाठी धावले भंडारावासी

    दिनांक :31-Oct-2019
 राष्ट्रीय एकता दौड उत्साहात
भंडारा,
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने गुरुवार, 31 आक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता स्थानिक गांधी चौकात राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
 

 
 
जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी एकता दौडीला हिरवी झेंडी दाखविली. गांधी चौकापासून सुरू झालेली दौड शहरातील विविध मार्गांनी फिरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनात पोहोचली. या दौडीद्वारे युवकांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी कार्यक‘माची रूपरेषा सांगितली. नेहरू युवा केंद्राचे अहिरकर, क्रीडा अधिकारी तसेच युवकांनी या एकता दौडीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.