राणू मंडलनं गायलं शाहरुखचं गाणं

    दिनांक :31-Oct-2019
मुंबई,
तुम्हाला राणू मंडल आठवतेय? काही दिवसांपूर्वी जिच्या गाण्यांची सोशल मीडियावर चर्चा होती. त्या राणू मंडलचं आणखी एक गाणं व्हायरल झालं आहे. शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे गाणं गायलं आहे. काही मिनिटांतच राणूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
'कॉमेडी स्टार्स' या रिएलिटी शोमध्ये राणूला पाहुणी म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी राणूनं शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील गाणं गायलं. राणूचा हा व्हिडिओ तिच्या फॅन क्लबवर पोस्ट करण्यात आला आहे. राणूच्या तेरी मेरी गाण्याला सुद्धा चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.
राणू मंडलवर बायोपिक
राणू मंडलच्या आयुष्याचा पट मोठ्या पडद्यावरदेखील झळकणार आहे. 'प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल' असं या बायोपिकचं नाव असणार आहे.दिग्दर्शक ऋषिकेश मंडल या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. पश्चिम बंगालच्या प्लॅटफॉर्मपासून ते बॉलिवूडमध्ये गाणं गाण्यापर्यंतचा राणू मंडलचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.