प्रिती दिसणार पोलिस भूमिकेत

    दिनांक :31-Oct-2019
सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे सलमान खान. काही दिवसांपूर्वी सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता दबंगच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे.
 
 
 
‘दबंग ३’ चित्रपटात अभिनेत्री प्रिती झिंटा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकताच प्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये प्रिती पोलिसांच्या पोशाखात दिसत आहे. तर प्रतिच्या शेजारी चुलबूल पांडे उभा असल्याचे दिसत आहे. ‘या हॅलोवीनमध्ये मी यूपीमधील एका खास व्यक्तीला भेटले. ओळखा कोण आहे ही व्यक्ती? विचार करा आणि सांगा’ असे कॅप्शन प्रितीने झिंटाने फोटो शेअर करत दिले आहे.
प्रितीची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत आहेत. प्रभू देवा दिग्दर्शित ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे.
दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमिवर विचार ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.