ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०४ ऑक्टोबर २०१९

    दिनांक :04-Oct-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०४ ऑक्टोबर २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन १२ शके १९४१
☀ सूर्योदय -०६:०६
☀ सूर्यास्त -१७:५६
 प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२७
 सायं संध्या - १८:१७ ते १९:२९
 अपराण्हकाळ - १३:३७ ते १५:५५
 प्रदोषकाळ - १८:१७ ते १९:२८
 निशीथ काळ - २३:५६ ते २४:४३
 राहु काळ - १०:५५ ते १२:२४
 श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
♦ कात्यायनी देवी दर्शन
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:३४ ते दु.०३:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तिळाचे तेल व आवळा खावू नये.
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५८ ते ०९:२६
अमृत मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५५
विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:१३
पृथ्वीवर अग्निवास नाही.
बुध मुखात १७:४० पर्यंत नंतर शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर १४:१३ पर्यंत नंतर भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी १४:१३ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - दक्षिणायन
ऋतु - शरद (सौर)
मास - आश्विन
पक्ष - शुक्ल
तिथी - षष्ठी (१४:१३ पर्यंत)
वार - शुक्रवार
नक्षत्र - ज्येष्ठा (१७:४० नंतर मूळ)
योग - आयुष्मान (०७:०६ नंतर सौभाग्य)
करण - तैतिल (१४:१६ नंतर गरज)
चंद्र रास - वृश्चिक (१७:४० नंतर धनु)
सूर्य रास - कन्या
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - रवियोग १७:४० पर्यंत
 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
 दुर्गा सहस्रनाम स्तोत्र व देवी कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
 "शुं शुक्राय नमः" व "दुर्गा" या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
 देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा.
 सत्पात्री व्यक्तिस तूप व सुगंधी अत्तर दान करावे.
 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना साखर खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
 चंद्रबळ:- वृषभ,मिथुन,कन्या, वृश्चिक,मकर,कुंभ या राशिंना सायं.०५:४० प.चंद्रबळ अनुकूल आहे.