आज वर्धेत 46 उमेदवारांनी केले नामांकन अर्ज दाखल

    दिनांक :04-Oct-2019
आतापर्यंत 67अर्ज दाखल
 
वर्धा, 
विधानसभा निवडणूक 2019 जिल्हयातील चारही विधानसभा निवडणूकीसाठी 27 सप्टेंबपासुन पासुन नामाकंन अर्ज उचल आणि दाखल करण्यास सुरवात झाली आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चारही विधानसभा मतदार संघात 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्या दिवसापासुन आतापर्यंत राष्ट्रीय पक्षासह अपक्ष असे एकुण उमेदवारांनी 67 नामांकन अर्ज दाखल केले आहे.
 
 

 
 
 
आर्वी विधानसभा
यामध्ये आर्वी येथे अपक्ष विलास विनायकराव कैलुके, बसपा चंद्रशेखर अजाबराव डोंगरे, बसपा सुनिल रामदासजी देशमुख, युवा स्वाभिमानी पार्टी दिलीप शामराव पोटफोडे, भाराका अमर शरदराव काळे, वंचित बहुजन आघाडी रुपचंद भुराजी टोपले, संभाजी ब्रिगेड संजय अंबादास वानखेडे, बहुजन मुक्ती पार्टी राहुल पारसनजी तायडे, अपक्ष माधव देशमुख असे एकुन 9 नामांकन
 
वर्धा विधानसभा
वर्धा वंचित विकास आघाडीचे उमेदवार अनंत शामराव उमाटे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रकाश बाजीराव वलके, अपक्ष निरज गुलाबराव गुजर, अपक्ष चंद्रशेखर बाजीराव मडावी, भाराकॉ शेखर प्रमोद शेंडे, अपक्ष सचिन पांडूरंग राऊत, सीपीआयएमआय चंद्रभान रामाजी नाखले, बहुजन समाज पाटी मनिष पुसाट, बहुजन समाज पाटी मोहन राईकवार व अपक्ष कैलास विश्वासराव भोसे असे एकुण 10 नामांकन,
 
देवळी विधानसभा
देवळी येथे अपक्ष राजेश सावरकर, भाराकॉ रणजित कांबळे, चेतन साहू, शिवसेना ज्ञानेश्वर ढगे, शिवसेना समिर देशमुख, वंचित बहुजन आघाडी सिध्दार्थ डोईफोडे, अपक्ष कपीलवृक्ष गोडघाटे, संभाजी ब्रिगेड पार्टी (अपक्ष) नितीन वानखेडे, अपक्ष राजेद्र बनमारे, बहुजन समाज पार्टी मोहन राईकवार, अपक्ष रमेश टिपले, बहुजन समाज पार्टी सुरेश नगराळे, बहुजन मुक्ती पार्टी हर्षपाल मेंढे व जय महाभारत पार्टी सुनिल पाटील असे एकुण 14 नामांकन अर्ज दाखल झाले असून आता पर्यंत 21 अर्ज दाखल करण्यात आले आहे
 
हिंगणघाट विधानसभा
हिंगणघाट अपक्ष प्रशांत पवार, अपक्ष मंदा ठवरे, लोकजागर पार्टी मनिष नांदे, राकॉ/अपक्ष सुधिर कोटारी, संभांजी ब्रिगेड प्रशांत देशमुख, राकॉ राजु तिंमाडे, अपक्ष मनिष कांबळे, मनसे अतुल वांदिले, बसपा विलास टेंभरे, अपक्ष अनिल जवादे, गोगपा दमडू मडावी, अपक्ष श्याम इडपवार, वंचित बहुजन आघाडी उमेश वावरे असे एकुण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.