नवरात्रीत मुलांच्या फॅशन...

    दिनांक :04-Oct-2019
अवंतिका तामस्कर
 
सण कोणताही असो, लहान मुलांचा त्या सणाला घेऊन उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो. नवरात्री म्हणजे सगळीकडे रोशणाई आणि उत्साहाचे वातावरण असते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अगदी नटून-थटून गरबा खेळताना ही चिल्ली-पिल्ली खूप निरागस आणि गोंडस वाटतात. 

 
 
नवरात्री म्हणजेच नऊ वेगवेगळ्या रंगांचा सण. रंग आणि लहान मुलं याचे वेगळेच एक नातं असतं. रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून गरबा खेळायला लहान मुलांना नक्कीच आवडत असणार. पण, रोज नवीन सणात लहान मुलांना काय द्यायचं हा प्रश्न त्यांच्या पालकांना नक्कीच पडत असेल. चला तर या वेळीच्या नवरात्रीमध्ये लहान मुलांसाठी कोणत्या नवीन फॅशन्स आल्यात.
 
 
मुलींसाठीचा गरबा पोशाख
मुलगी लहान असो िंकवा मोठी, सणवार असेल तर नटणं, मुरडणं हे आलेच. या नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठेत लहान मुलींसाठी घागरा चोळी उपलब्ध आहेत. एक वर्षाच्या मुलींसाठी देखील बाजारात डिझायनर चनिया चोळी पाहायला मिळतील. हे झालं पोशाखाचं आता मुली म्हटल्या तर ड्रेस सोबत आणखी गोष्टी येतात व छोट्या-छोट्या हातासाठी बांगड्या, कानातले, गळ्यासाठी नेकलेस या सगळ्या गोष्टी बाजारात उपलब्ध असतात.
 
 
मुलांसाठीचा गरबा पोशाख
मुलींसाठीचे गरबा पोशाख अगदी सहजरीत्या पाहायला मिळतात; परंतु फक्त मुलांसाठी काय? तर त्यांनादेखील काळजी करण्याची गरज नाही. बाजारात लहान मुलांसाठी केडियू नावाचा नवा प्रकार आला आहे. मोती, घुंगरू, शंख आदी गोष्टींनी वर्क केलेला हा ड्रेस लहान मुलांवर अगदी उठून दिसतो. याला मॅिंचग अशा वेगवेगळ्या रंगाच्या मोजडी देखील बाजारात उपलब्ध असतात.
 
 
लहान मुलांसाठी दांडिया
लहान मुलांसाठी वेगवेगळ्या लाईिंटगच्या तसेच वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या दांडिया देखील उपलब्ध असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन्स या लहान मुलांमुलींसाठी उपलब्ध आहेत. एकंदरितच बाजारात आलेल्या या फॅशन्समुळे लहान मुलांचा नवरात्रीमधील उत्साह आणखी द्विगुणित होईल.