दोन पोलिसांवर विनयभंगचा गुन्हा दाखल

    दिनांक :04-Oct-2019
 

 
 
हिंगणघाट,
हिंगणघाट पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस कर्मचारी उमेश लडके व राहुल साठे यांच्यावर बुटीबोरी पोलीस स्टेशनला काल विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला. हिंगणघाट पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी बुटीबोरी नजीकच्या एमआयडीसी येथील निर्जन स्थळी जाऊन युवतीचा विनयभंग केल्याबाबत गुन्हा बुटीबोरी येथील पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आला आहे. यात हिंगणघाट पोलिस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी उमेश लडके व राहुल साठे हे काल सायंकाळी सात वाजता दुधा गाव ते सिंधी रेल्वे यादरम्यान रोडवर थांबून सिंधी रेल्वे येथून दुधा या आपल्या गावी येत असलेल्या एका मुलीचा विनयभंग केला यात या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी या मुलीचा अर्धा किलोमीटर पाठलाग केला या दरम्यान या मुलीने आपल्या वडिलांना फोनवर याबाबत माहिती दिली. तुला येथील गावकऱ्यांना ही माहिती मिळताच ते गावाजवळ जमले होते. बुट्टीबोरी येथे यातील पीडित मुलींनी तक्रार दिली तक्रारीवरून दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.