अहेरीत भव्य शक्तीप्रदर्शन करीत काका-पुतण्याने भरला उमेदवारी अर्ज

    दिनांक :04-Oct-2019
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून तर भाजप महाआघाडी कडून अंबरीश राव आत्राम यांचे नामांकन सादर
मिलिंद खोंड
अहेरी, 
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात राजघराण्यातील काका-पुतण्या एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. 69 अहेरी विधानसभा क्षेत्रातुन माजी राज्यमंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकड़ून तर राजे अम्बरीष राव आत्राम भाजप पक्षाकड़ून आज अहेरी शहरात आपल्या समर्थकांसह भव्य शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज अहेरी येथील उपविभागीय कार्यालयात भरला.
 
 
 
अहेरी राजघराण्यातून काका ,पुतण्यानी उमेदवारी अर्ज उपविभागीय दंडाअधिकारी अहेरी येथे केला दाखल केला..
उमेदवारी अर्ज दाखल करण्या- अगोदर माजी राज्यमंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम आणि राजे अंबरीश राव आत्राम घरातील कुलदेवतेची पूजा करून पारंपरिक आदिवासी नृत्यकला ,दाखवित ढोल ताष्याच्या गजरात हजारो समर्थकासह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्यात आला आहे .