चिखली मधून १२ उमेदवारांचे अर्ज वैध

    दिनांक :05-Oct-2019
चिखली विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ४ ऑक्टोंबर दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १५ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल होते, त्यापैकी १२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचे आणि राज्यातील राजकीय पक्षाचे उमेदवार परवीन सैय्यद,  हारुण सैय्यद बहुजन समाज पार्टी, राहुल बोंन्द्रे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, श्वेता महाले यांचा भारतीय जनता पार्टीचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे . नोंदणीकृत बिगर मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार अशोक सुरडकर वंचित बहुजन आघाडी यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. अन्य अपक्ष उमेदवार अब्दुल सलीम, अब्दुल नुर मोहम्म्द मेमन, इम्रानखान उमर खान, खालीद अहमद खान, तालीब खान, दगडुबा साळवे, दादाराव श्रीराम पडघान, देवानंद गवई, निसार अ. कादर शेख, राजेंद्र जंवजाळ यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.
 
 
 
शेषराव दगडू मघाडे ,प्रशांत अविनाश डोंगरदिवे , शे. राजु शे. बुढन शेख यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे तसेच एम आय एम कडून निसार अ. कादर यांनी भरलेला अर्ज सुद्धा अवैध ठरविण्यात आला आहे. सोमवारी निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात राहतील याचे चित्र स्पष्ट होईल .