राज्यात 5,534 उमेदवारांचे 7, 584 अर्ज

    दिनांक :05-Oct-2019
तभा वृत्तसेवा
मुंबई,
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी राज्यभरातील विविध मतदारसंघांमध्ये एकूण 5,534 उमेदवारांनी 7,584 अर्ज दाखल केलं आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असून, 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी परत घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर किती उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील, हे निश्चित होणार आहे.
 
 
 
 
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 135 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कंन्टोनमेंट मतदारसंघात 85 उमेदवारांनी आणि सर्वांत कमी अर्ज मुंबईतील माहिम आणि शिवडी मतदारसंघांमध्ये दाखल झाली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 4 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
 
विदर्भात 1197 अर्ज दाखल
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर बुलढाणा जिल्ह्यातील 7 मतदारसंघात 95, अकोला जिल्ह्यातील 5 मतदारसंघात 107, वाशीम जिल्ह्यातील 3 मतदारसंघात 63, अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघात 176, वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघात 64, नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात 253, भंडारा जिल्ह्यातील 3 मतदारसंघात 70, गोंदिया जिल्ह्यातील 4 मतदारसंघात 76, गडचिरोली जिल्ह्यातील 3 मतदारसंघात 47, चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 110 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 7 मतदारसंघात 136 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
 
मुंबई आणि उपनगरात 441 अर्ज
मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघ येतात. यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 335 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, मुंबई शहरातील 10 मतदारसंघात 106 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.