चंद्रकांत पाटलांना दिलासा, ब्राह्मण महासंघाकडून पाठिंबा जाहीर

    दिनांक :05-Oct-2019
पुणे,
कोथरुडमधून उमेदवारी जाहीर अपप्रचाराला ऊत आलेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महायुतीचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. पुण्यात बैठक आज ब्राह्मण महासंघ आणि पाटील यांच्यामध्ये खलबते झाली.

 
 
महासंघ प्रदेशाध्यक्षा प्रा. मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष यांच्यासह जितेंद्र कुलकर्णी, प्रवक्ते आनंद दवे आदींच्या स्वाक्षरीने चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देणारे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ब्राह्मण समाजासाठीचे आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांचे प्रश्न आदींबाबत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्राधान्याने सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आल्याचे महासंघाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीवेळी समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांवरही उहापोह करण्यात आला. त्या मागण्यांवर सहाभूतीने विचार करून निर्णय घेण्यात आला. पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ब्राह्मण महासंघाने त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून पाठिंबा जाहीर केला.